एकमेकांना गळाभेट देत नेवासा येथे विजयादशमी साजरी

शमीच्या झाडाच्या पूजनासाठी नेवासा येथे भाविकांची गर्दी !

नेवासा,(प्रतिनिधी)
एकमेकांना गळाभेट घेत दसऱ्याच्या शुभेच्छा देत नेवासा येथे विजयादशमी दसरा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.आपटयाच्या 
पानांच्या सोने देवदेवतांना अर्पण करत भाविकांनी श्रद्धेने जामदार वस्तीवर पुरातन महिमा असलेल्या शमीच्या वृक्षाचे दर्शन घेतले यावेळी शमीचे वृक्ष पूजनासाठी नेवासा येथील भाविकांनी जामदार मळ्यात गर्दी केली होती.
    दसरा सणाच्या निमित्ताने सकाळ पासूनच नेवासकरांची मोठी लगबग दिसून आली बाजारात झेंडूची फुले व आपट्याची पाने खरेदी करण्यासाठी लोकांची लगबग दिसून आली.व्यापाऱ्यांनी आपल्या वहीच्या पानावर स्वस्तिक काढून विधीवत परंपरेने चालत आलेल्या
पद्धतीने पूजन केले तर बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी
पोटापाण्यासाठी लागणाऱ्या कुदळ,फावडे,थापी,घमेले या हत्यारांचे पूजन केले घरोघरी वहया पुस्तकाचे पूजन पाटावर ठेऊन रांगोळी काढून करण्यात आले.घरोघरी मंगलमय वातावरण यानिमित्ताने दिसून येत होते.
      नवरात्रानिमित्ताने घटस्थापना केलेल्या मंडळासह गावांतील देवी मंदिरासमोर सायंकाळी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती सायंकाळच्या सुमारास परंपरेने धनगर समाज व माळी समाजाच्या वतीने डफावर थाप देत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूकीचे उत्स्फूर्त स्वागत नेवासकरांनी केले.या झेंडा काठी मिरवणुकीचा समारोप जामदार वस्ती येथील शमीच्या वृक्ष प्रांगणात करण्यात आला सायंकाळी जामदार वस्तीवर असलेल्या शमीचे वृक्षासह संत कबीर महाराज मंदिरात ही मोठी गर्दी झाली होती यावेळी दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांचे आण्णासाहेब जामदार,वसंत जामदार,प्रदिप जामदार,प्रविण जामदार,दीपक जामदार यांनी स्वागत केले.ब्रह्मवृंद मंडळींनी वेदमंत्राचा जयघोष करत आलेल्या भाविकांना शमीची पाने वाटली.
    
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जुन्या परंपरा मोडीत
दसरा सणाला वाजत गाजत निघणाऱ्या झेंडा काठ्यांचे  तहसीलदार यांच्या हस्ते पानसुपारी देऊन भंडारा उधळून स्वागत करण्याची परंपरा होती ही परंपरा यावर्षी मोडीत निघाली तलाठी कार्यालय बंद होते त्यामुळे मानाच्या काठयांचे पूजन झाले नाही याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.तसेच तलाठी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत गावाच्या विकासाच्या दृष्टीने जमा खर्च लिहिण्याची परंपरा होती ती माहिती नसल्याने तहसीलदार देखील याठिकाणी आले नाही आणि जुन्या परंपरेला तिलांजली देण्यात आली यामुळे ही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget