प्रतापराव ढाकणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

बोधेगाव - वार्ताहर 
भाजपच्या सारकारकरने खोटी आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करून मोठी फसवणूक केली सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून शरदचंद्रजी पवारांचे हात बळकट करण्याचे अहवान सभापती डॉ क्षितिज घुले पाटील यांनी व्यक्त केले 
शेवगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी मित्र पक्षाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बालमटाकळी येथील ग्रामदैवत बालंबिका देवी मंदिरात सभापती डॉ क्षितिज घुले केदारेश्वर चे संचालक ऋषिकेश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर सुकळी, गायकवाडजळगाव, शेकटे, लाडजळगाव आदी भागात प्रचारार्थ मतदारांच्या भेटी गाठी घेतल्या त्यास चांगला प्रतिसाद मिळाला गेला 
         यावेळी बोलताना डॉ घुले म्हणाले   भाजपा सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत सापडल्याने मोठा फटका बसला आहे विद्यमान लोकप्रतिनिधींनी प्रलंबित ताजनापूर योजनेला निधी मिळण्यासाठी प्रयत्न न केल्याने हा प्रकल्प रेंगाळला आहे    जायकवाडीचे  हक्काचे पाणी मिळत नाही ही शोकांतिका बनली आहे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांना विजयी करावे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे अहवान केले ऋषीकेश ढाकणे म्हणाले भाजपा सरकारने बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी नियोजन केले नाही       
युवकांना दिलासा मिळण्यासाठी राष्ट्रवादीला खंबीर साथ द्यावी 
यावेळी जेष्ठ नेते काकासाहे नरवडे, मोहनराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, डॉ प्रकाश घनवट, बाबासाहेब भाकरे, सुदाम शिंदे, वसंत घाडगे, छगन राजपुरे, सचिन राजपुरे, भास्कर बामदळे, भानुदास गलधर, माणिक शिंदे, चंद्रकांत बागडे, शेखर बामदळे, संदीप शिंदे, संदीप हाकले, भाऊसाहेब बामदळे, प्रशांत देशमुख, यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोक वैद्य यांनी आभार मानले

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget