विसापूर
श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी वन्यजीव सप्ताह निमित्ताने नुकताच चिखली घाटातील जंगलाचा आभ्यास दौरा केला.
या वेळी विद्यार्थ्यांनी चिखली घाटातील महींदेश्वर डोंगर रांगेत असणाऱ्या जंगलात विविध प्रकारच्या झाडा व झुडपांची माहीती मिळवली.त्यावेळी त्यांनी कधी न पाहीलेले वन्यप्राणी व पक्षी यांचे विषयी माहिती घेतली.सर्वांनी झाडांच्या गार सावलीत बसून विभाजनाचा आस्वाद घेतला.वनपरिक्षेत्र अधिकारी नातु यांनी जंगलाचे महत्त्व सांगताना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विविध वनौषधी वेली,झाडे व वन्यजीव या विषयावर माहिती दिली.वनरक्षक हरिष मुंडे यांनी आरोग्यदायी रानभाज्या बाबत माहिती दिली.यावेळी वनपाल रायकर व गारुडकर,वनरक्षक पगारे,गायकवाड व गुंजाळ, वन कर्मचारी, महाराजा जिवाजीराव शिंदे कॉलेजचे प्राध्यापक उपस्थित होते.

Post a Comment