नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा येथील दुर्गादेवी भक्त ज्योतिष शास्त्र तज्ञ दीपक शिंदे यांनी काढलेल्या "दुर्गा अनुभूती" पुस्तकाचे प्रकाशन गुरुवर्य भास्करगिरीच्या हस्ते देवगड येथे करण्यात आले.दुर्गादेवी दर्शनाने भाविकांच्या पूर्ण झालेल्या मनोकामना याचा उल्लेख दुर्गा अनुभूती पुस्तकात करण्यात आला आहे.
श्री क्षेत्र देवगड येथे दुर्गा अनुभूती पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी गुरुवर्य भास्करबाबांनी पुस्तकाची पहाणी केली सर्व देवदेवतांच्या आरत्या देवी स्त्रोत्र या सर्वांचा उल्लेख व देवीची महती सांगणारा लेख भक्तांना आलेले अनुभव या सर्वांचा समावेश दुर्गा अनुभूती पुस्तकात झाल्याने संग्रही ठेवण्यासारखी पुस्तिका तयार झाल्याचे पाहून गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी झालेल्या प्रकाशन कार्यक्रमाच्या प्रसंगी दुर्गा अनुभूती पुस्तकाचे प्रकाशक दीपक शिंदे(गुरव)दुर्गादेवी मंदिराचे विश्वस्त पत्रकार सुधीर चव्हाण,विलास शिंदे, ज्ञानभूमीचे संपादक अशोकराव ताके,संत सेवक बाळू महाराज कानडे,मनोज पवार,संदीप साबळे उपस्थित होते.
दुर्गा अनुभूती पुस्तकाचे प्रकाशक दीपक शिंदे हे जोतिष शास्त्र तज्ञ असल्याने रोज लोक त्यांच्याकडे येतात देवीच्या आलेल्या साक्षात्काराची प्रचिती शिंदे यांना असल्यामुळे त्यांनी ज्योतिषी विद्या सांगतांना देवीच्या कार्याचा प्रत्यय देत सल्ला देण्याचे काम केले त्यानुसार देवीच्या आलेल्या प्रचितीमुळे भाविकांनी देखील देवीच्या साक्षात्काराचे अनुभव लिखित स्वरूपात मांडल्याने दीपक शिंदे यांनी ही पुस्तिका गुरुवर्य भास्करबाबांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.
दुर्गा अनुभूती पुस्तिकेचे प्रकाशन गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते झाल्यानंतर नेवासा येथे नवरात्रानिमित्ताने होणाऱ्या आरतीच्या वेळेत उपस्थित भाविकांना दुर्गा अनुभूती पुस्तिकाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment