आमदार राहुल जगताप यांचे आवाहन.

पस्तीस वर्षाचे कामाचा लेखाजोखा पाचपुतेंनी जनतेसमोर मांडावा पाच वर्षाचा हिशोब मी मांडतो-

विसापूर
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पस्तीस वर्षात किती कामे केली याचा लेखाजोखा जनतेसमोर येऊन मांडावा.समोरासमोर येऊन पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब मी देण्यासाठी तयार असल्याचे जाहीर आवहान आमदार राहुल जगताप यांनी कोळगाव ता.श्रीगोंदा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्या प्रचार सभेत बोलताना केले. 
   सभेचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच विठ्ठल नलगे होते.आ.जगताप पुढे म्हणाले की,पाचपुतेंची पस्तीस वर्षात केलेले कामे कमी निघाले तर त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शेलार यांना पाठिंबा द्यावा.पाच वर्षात मी केलेली कामे जास्त नसल्यास आम्ही सर्वजन पाचपुतेंचा प्रचार करु.ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची अशीच होणार आहे.मी केवळ कुकडी साखर कारखानाकडे अधिक सक्षमपणे लक्ष देण्यासाठी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असला तरीही कायम आमदार की आपल्याकडेच असावी हा माझा अट्टाहास नव्हता हे मुख्य कारण त्यामागे आहे. जर ठराविक घराण्यातीलच लोकांकडे सत्तास्थाने कायम रहाणार असतील तर इतर सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचे यामुळे मी यावेळी घनश्याम शेलार यांना संधी देण्याचा निर्णय घेतला.पाचपुते यांनी मात्र भाजपाचा डमी अर्ज भरण्याची इतर कार्यकर्त्यांना संधी न देता त्यांनी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांचा डमी अर्ज भरला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम शेलार म्हणाले की,एकीकडे कुकडी साखर कारखान्याचे शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे २८३ रुपयांचे बिल वेळेत देता आले नाही मात्र नंतर दिले असतानाही आमदार राहुल जगताप उमेदवारी नाकारतात.मात्र दुसरीकडे पस्तीस वर्षे सत्ता उपभोगुन समाधान झाले नाही.पाच वर्षापूर्वी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले म्हणून पराभूत झाले.आद्याप त्या लोकांना पैसे दिले नाही तरी या निवडणुकीत उभे रहाणारे उमेदवार आहेत.फक्त खुप काही केलय आणि खूप काही करायचे राहीले अशा पाचपुते वल्गना मारतात.पाचपुते यांचे बोलणे म्हणजे बोलाचाच भात व बोलाचीच कढी अशी अवस्था आहे.साकळाई पाणी योजनेचा मीच १९९५ साली प्रस्ताव मांडला त्याला पाचपुते यांनी विरोध केला.त्या योजनेचा खरा जनक मीच आहे असे शेलार म्हणाले.यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष व जेष्ठ नेते बाबासाहेब भोस,जिल्हा परिषदचे माजी सदस्य अनिल विर,दादा निर्फळ,विजय नलगे,धोंडीबा लगड यांची भाषणे झाली.यावेळी कोळगावच्या सरपंच वर्षा काळे,विस्वास थोरात,एकनाथ बारगुजे,विवेक पवार,मच्छिंद्र नलगे,राजाराम जठार,राजेंद्र नलगे,दामोधर साके,काका डुबल व नितीन डुबल उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget