नेवासा(प्रतिनिधी)
विचाराने व कृतीने जीवंत राहण्यासाठी जीवनात चांगले कर्म करा,देवतासमान असणाऱ्या मातापित्यांची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करा असे आवाहन रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी नेवासा येथील मळगंगादेवी मंदिर प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना केले.
नेवासा येथील मळगंगा देवी मंदिराचे प्रमुख देवीभक्त स्वर्गीय लक्ष्मणराव घोलप यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे म्हणाले की देवीभक्त स्वर्गीय लक्ष्मणबाबा घोलप हे १०८ वर्षे जगले नेवासे या पवित्र भूमीत त्यांनी निघोज येथील मळगंगादेवीची स्थापना केली नंतर त्यांचे चिरंजीव देवीभक्त रेणुकादास घोलप व परशुराम घोलप या त्यांच्या मुलांनी क्षेत्र नेवासेनगरीच्या वैभवात भर घालणारे मळगंगा देवीचे मंदिर उभे केले आज येथे दर पौर्णिमेला भंडारा अन्नदान कार्यक्रम होतात अनेकांना देवीच्या उपासनेने प्रचिती आली हजारो भक्तांना त्यांनी परमार्थाला लावले . असेच कार्य जीवनात प्रत्येक मुलाने करावे आईवडील हे भूतलावरील दैवत असल्याने शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा करा त्यांना दुखवू नका संत संगतीची कास धरून जीवनात परमार्थ करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी रेणुकादास घोलप,सौ.सुमनताई घोलप,परशुराम घोलप,सौ.लताताई घोलप,रामभाऊ घोलप,सौ.जयश्री घोलप, सौ.सुशीला शित्रे,सौ.मंगल देवमारे,सचिन घोलप, सौ.ज्योतीताई घोलप,सौ.जयश्री घोलप,सौ.उषा शिंदे, सौ.नंदा यादव,सागर घोलप,सौ.वैशाली घोलप,संदीप घोलप व सौ.भारती घोलप यांच्या हस्ते मळगंगा देवीची आरती करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक रेणुकादास घोलप व परशुराम घोलप रामभाऊ घोलप यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले.यावेळी हभप लक्ष्मीनारायण जोंधळे,हभप गणेश महाराज चौधरी, भाऊसाहेब चौधरी,भास्करराव तारडे,भाऊसाहेब महाराज मोरे,पोपटराव बोरुडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment