आम्ही धमक आसलेले लोक आहोत ! पंतप्रधान मोदींच्या नेत्तृत्वाखाली बलशाली महाराष्ट्र बनविणार - मुख्यमंञी देवेंद्र फडणविस
नेवासा,(प्रतिनिधी)
आमच्या पुढे धमक्याचे राजकारण चालणार नाही आम्ही धमक आसलेले लोक आहोत. निवडणूका १०-१२ दिवसांवर येवून ठेपल्या आहेत पण या निवडणूकीत मजाच येत नाही आमचे पैहिलवान मैदानात उतरले आहेत समोर कोणी लढायला लवकर तयार होत नाही नेवाशाच्या इतिहासात पहिल्यांच आघाडीच चिन्ह गायब झाल कोणी लढायला तयार नाही.राहूल गांधींना भविष्याचा अंदाज आला ते बँकॉकला निघून गेले शरद पवारांचे आधे उदर आधे इदर चालले आहेत पंतप्रधान मोदींच्या नेत्तृत्वाखाली महाराष्ट्राला बलशाली निर्माण करायचे आहे. सर्वसामान्यांचे चिञ बदलायचे आसल्याने जनता महायुतीच्या मागे आसल्याचे राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांनी नेवासा फाटा येथे झालेल्या जाहीर सभेत बोलतांना केले.
शुक्रवार (दि.१०) रोजी दुपारी १ वाजता महाजनादेश संकल्प सभेचे आयोजन नेवासा फाटा करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर खासदार सदाशिव लोखंडे,डॉ सुजय विखे,आमदार शिवाजी कर्डीले,बाळासाहेब मुरकुटे,युनायटेड रिब्लिकन पार्टीचे प्रमुख अशोक गायकवाड,अभय आगरकर,अंकूश काळे,अंबादास कोरडे,नितीन दिनकर,शिवसेनेचे हरिभाऊ शेळके,मच्छिंद्र म्हस्के नितीन जगताप,पुजा लष्करे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना फडणविस म्हणाले की,विरोधक खोटे बोल पण रेटून बोल असा एक कलमी कार्यक्रम करत आसून तुमच पाणी बिडला पळवून नेणार आसल्याच्या वावड्या उठवत आहेत.हे पाणी काय विमानाने घेवून जाणार का ? असा सवाल करत तुमच्या हक्काच एक थेंब पाणी सुद्धा पळविणार नसल्याचे ग्वाही देत तिर्थक्षेञासाठी एक हजार कोटी रुपयांची मोठी तुरतूद करणार होतो पण आचारसंहितेमुळे ते शक्य झाले नाही हे काम मी निवडणूका संपल्यावर करणार आसल्याचे मुख्यमंञ्यांनी यावेळी सांगितले.३७० कलम हटवून काश्मीरमध्ये तिरंगा फडकावला हे काम पंतप्रधांनी करुन दाखवले त्यांच्या नेत्तृत्वाखाली महाराष्ट्राला बनशाली बनविण्यासाठी तुमची साथ हवी आसल्याचेही यावेळी मुख्यमंञ्यांनी सांगितले.शेतकरी,शेतमजूर बेरोजगारांना तालूक्यात हाताला काम देण्यासाठी उद्योग निर्माण करणार आसून महायुतीचे सज्जन उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांना विजयी करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी स्वतंञ नेवासा विधानसभेचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की,मुख्यमंञी फडणविस यांनी तालूक्याला विकासासाठी मोठा निधी दिला.त्यामुळे तालूक्याचा विकास झाला आता शेतकऱ्यांच्या ऊसाची जबाबदारी खासदार डॉ सुजय विखे यांनी घेवून नेवासा पुण्यभूमिच्या तालूक्याच्या विकासासाठी मुख्यमंञ्यांनी नेवासा दत्तक घेण्याची मागणी केली. यावेळी भाजप सेना मिञ पक्षाचे कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment