मतदानालाच बाहेर पडणार ! नो कॉमेंटस् सगळीकड शांतता ? चुलबूलपांडेंची चांदी ?
नेवासा,(प्रतिनिधी)
स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख व भाजपाचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यामध्ये काटे की टक्कर लढत होत आसून सध्या खालच्या स्थरातील कार्यकर्त्यांनी गचपडीची भूमिका घेतली आसून राजकिय रणांगणात नो कॉमेंटस् करत थेट मतदान यंञातच आपली भूमिका ते मांडणार आहेत.माञ दोन्ही थडीवर हात ठेवणारे चुलबूलपांडे कार्यकर्त्यांची या निवडणूकीत मोठी चांदी होत आसून स्वयंमघोषित आव आणणारे पुढारे पांढरे कपडे परिधान करुन आपले उखळ पांढरे करुन घेतांना दिसत आहेत.
नेवासा मतदार संघात १७ उमेदवार आहेत माञ १५ उमेदवार आसून नसल्यासारखे आहेत. त्यांचा ना प्रचार ना मतदारांमध्ये चर्चा माञ गडाख - मुरकुटेंमध्ये काटे की टक्कर होत आसल्याने सर्वसामान्य मतदार गचपडीची भूमिका घेतांना दिसून येत आहेत. कोणाचाही उदो - उदो न करता थेट मतदानाच्या दिवशीच आपली भूमिका मतदान यंञात ते मांडणार आहेत.ना कोणाशी दुश्मनी ना कोणाचा प्रचार ना पार्ट्या अशी गचपडीची भूमिका ते सध्या साकरत आसून आपला निर्णय आपणच घेवून राजकारणाच्या गप्पाही करण्यास धजावत नाहीत.
भाजपाचे उमेदवार विकासाच्या जोरावर तर क्रांतिकारी पक्षाचे उमेदवार कार्यकर्त्यांच्या बळावर रणांगणात आपले बस्तान बसवत आहेत.मुरकुटेंकडून १२०० कोटींच्या विकासचे भांडवल करुन तर गडाखांकडून मुरकुटेंच्या विकासाला भष्ट्राचारचा हॉर्न देत कार्यकर्त्यांच्या बळावर देत झुंज देत आहेत.चुलबुलपांडे दोन्ही थडीवरचे कार्यकर्ते या निवडणूकीत आपली चांदी करुन घेत आसून सेटलमेंट झाली की पांढरा डगला गुंतवून त्या नेत्यांची री... मतदार संघात ओढतांना दिसत आसल्याचे चिञ आहे.ही या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागून आहे.कारण उमेदवार पक्षाच्या तिकीटासाठी धडपडतात तर गडाखांनी तिकड झुगारुन अपक्ष शड्डू ठोकला आहे तर भाजपाचे उमेदवार मुरकुटेंमागे पक्षाची ताकद मंञ्यांच्या सभा त्यामुळे वातावरण नेमके चढउताराचे होत आसल्याने दोन्ही उमेदवारांत धाकधुक होत आहे.माञ गडाखांची हिंमत कार्यकर्त्यांच्या बळावर मतदार संघात तग धरुन उभी आहे.त्यामुळे नेवाशाच्या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

Post a Comment