नेवासाफाटा येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना उबदार कपड्यांचे वाटप

नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.लक्ष्मणराव खंडाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेवासाफाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्धांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.
        यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.लक्ष्मणराव खंडाळे,तालुका विद्या प्रसारक मंडळाचे सचिव शंकरराव नळकांडे,किरण जपे,आदित्य खंडाळे, समीर घुले,निलेश खंडाळे,वृद्धाश्रम सचिव सौ.सुरेखाताई साळवे,चालक रावसाहेब मगर,वृद्धाश्रम कमिटीचे जिल्हाध्यक्ष पत्रकार बाळासाहेब देवखिळे,उपाध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यावेळी उपस्थित होते.
    यावेळी उपस्थित सर्व वृद्धाश्रमातील वृद्धांना उबदार कपडे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.प्रारंभी वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या सचिव
सौ.सुरेखाताई मगर यांनी वृद्धाश्रम कामकाजाविषयी माहिती दिली.
    यावेळी उपस्थित वृद्धांना उबदार कपड्याचे वाटप करण्यात आले.वाढदिवसाचा आनंद हा वाटून साजरा केला तर खरा देवाचा आशीर्वाद मिळाल्याचे समाधान मिळते म्हणून मित्र परिवाराने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोदगार डॉक्टर लक्ष्मणराव खंडाळे यांनी यावेळी बोलतांना काढले तसेच वृद्धाश्रमासाठी आरोग्य सेवेच्या माध्यमातून योगदान देत राहू अशी ग्वाही दिली.
    यावेळी उपस्थित वृद्धांच्या वतीने भक्तिगीते सादर करून दीर्घायुष्यासाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.यावेळी वृद्धाश्रमाचे सेवेकरी संतोष मगर,ज्योती मगर प्रतिक्षा शिरसाठ यांच्यासह वृद्ध स्त्री पुरुष उपस्थित होते.उपस्थित वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात येऊन हा अभिनव उपक्रमाची सांगता करण्यात आली.सौ.सुरेखाताई मगर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget