नेवासा,(प्रतिनिधी)
नेवासा पोलिस ठाण्याच्या वतीने मंगळवारी शहरात पथसंचलन करण्यात आले.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पथसंचलन करण्यात आले.
शहरातील विविध भागात फिरून पोलिसांनी पथसंचलन केले. विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी होणार असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी व शहरातील उपद्रवी लोकांवर जरब बसावी यासाठी पथसंचलन करण्यात आले तसेच पोलीस रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगाराचें घरी जाऊन सर्चिंगं ओफ्रेशन करण्यात आले
यावेळी शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व पोलीस निरीक्षक रणजित डेरे असिस्टंट कमांडट पतीयाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले
यावेळी पोलीस उपअधीक्षक एक पोलीस निरीक्षक एक असे एकूण 2 अधिकारी तसेच बारा पोलीस कर्मचारी व ६४ स्पेशल सर्व्हिस बिरो जवानांचे पथक व गृहरक्षक दलाचे बारा जवान असे एकूण ८४ कर्मचारी यांनी भाग घेतला होता
पोलीस ठाण्यापासुन नाथबाबा चौक,खोलेश्वर गणपती मंदिर,नगर पंचायत कार्यालय,वाखुरे चौक,नुरानी मस्जिद, नायकवाडपुरा, शेंडे गल्ली,श्रीराम मंदिर ,मारुती मंदिर, व्यापारी पेठ असे पथसंचलन करण्यात आले.
पथसंचलन पाहण्यासाठी नागरीकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती .पथसंचलन नेवासा बस स्थानकात आल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी संचलनातील जवानांना विधानसभा निवडणुकीच्या सूचना दिल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा तसेच विधानसभा निवडणूका शांततेत पार पाडाव्या असे नागरिकांना आवाहन केले.यावेळी नेवासा बस स्थानकात पथसंचलनाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment