नेवासा,(प्रतिनिधी)
स्वतंञ नेवासा विधानसभा निवडणूकीकडे हार - जितसाठी संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.कारण पक्षाचे तिकड मिळविण्यासाठी इकडून - तिकडे उमेदवार पळत सुटून पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी राजकिय ताकद वापरुन तिकीट पदरात पाडून घेत आसल्याचे अख्या महाराष्ट्राने अनूभवलेले आसतांना माजी आमदार शंकरराव गडाख यांनी पक्षाचे तिकीट झुगारुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन उमेदवारी लढविली त्यांच्या विरोधात भाजपाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह एकूण १७ उमेदवार रणांगणात आसतांना लढत केवळ गडाख - मुरुकुटे यांच्यामध्येच चालू आसल्याचे प्रचार काळात सप्रमाण सिध्द झाले.
आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यात कत्तल की रात सुरु झाली मतदारांना भूरळ घालण्यासाठी सोशल मिडीयावर मतदारांना आवाहन करण्यासाठी संदेशाचा पाऊस सुरु झाला आहे. विविध प्रकारच्या क्लृप्त्या आखल्या जात आसून कोणी सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकून तर कोणी उत्तर द्या पोस्टर भिंतीवर लावून मतदारांत संर्भमावस्था निर्माण करत आसल्याचे दिसून आले.भाजपाचे आमदार उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंञी देवेंद्र फडणविस व राज्याच्या ग्रामविकासमंञी पंकजा मुंढे यांनी सभा घेतल्या तर अपक्ष उमेदवार शंकरराव गडाखांसाठी नेवाशात राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेत घुले - गडाखांचा वाद मिटवत एकोपा निर्माण केला. गडाखांनी तालूका पिंजून काढत जनतेला आ.मुरकुटेंच्या राजकिय चुका दाखवून देवून माझ्या राजकिय जुगाराला साथ देण्याचे भावनिक आवाहन केले तर मुरकुटेंकडून विकास काय आसतो हे मी पाच वर्षात दाखवून दिल्याचे प्रचारादरम्यान सांगितले.नेवाशात गडाख - मुरकुटेंची लढत प्रचारादरम्यान मोठी रंगतदार झाली आता प्रचाराच्या तोफा थंडवल्या आसून चमत्कार नमस्कार सुरु झाले आहेत.काही ठिकाणी मतदारांना भूरळ घालण्यासाठी उमेदवार भावनिक बनले आहेत तर कोणी पोस्टर बाजीतून तर कोणी सोशल मिडियातून एकमेकांची खिल्ली उडवत आपणच कसे लायकवान आहोत हे दाखवून देत आसून ही निवडणूक मोठी रंगतदार होण्याची चिन्हे जाणकारांतून व्यक्त होतांना दिसून येत आहेत.

Post a Comment