विसापूर
पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा येथील रेणुकादेवी विद्यालयात वनविभागाकडुन विद्यार्थ्यांना बिबट्यापासुन कशी सावधानता बाळगावी व संरक्षण करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पिंपळगाव पिसा परीसरात विसापूर व कुकडी कालव्याचे पाणी फिरल्यामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.पाण्याची उपलब्धता,दडण्यासाठी ऊसाचे शेताचा होणारा उपयोग या मुळे परीसरात बिबटे व तरस यांचा वावर वाढला आहे.गेल्या काही दिवसात बिबट्याने अनेक रानडुकरे व कुत्र्यांना लक्ष बनवले.काही जनावरांचेवर हल्ला चढवला.त्यामुळे वनविभागाकडुन जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे.रेणुकादेवी विद्यालयाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनरक्षक संदीप भोसले यांनी सांगितले की,सध्या परिसरात तरस व बिबट्यांचा वावर वाढला असल्याने सावधान रहाणे गरजेचे आहे.रात्री एकट्याने घरा बाहेर पडणे टाळावे.रात्री बाहेर पडताना बॅटरी सोबत ठेवावी.वन्यप्राण्यांचा संशय आल्यास आग पेटवावी व गलका करावा.लहान मुलांना एकाकी सोडून नये.जनावरांचे गोठ्याला जाळी बसवून घ्यावी.शेतात जाताना घुंगराची काठी हातात ठेवावी.घरापासुन तिस-पस्तीस फुटांवर ऊस व जास्त उंचीच्या पिकांची लागवड करावी.जेणे करून बिबट्याची चाहुल लागेल व अचानक हल्ला होणार नाही.या वेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना भोसले यांनी बिबट्या व तरस यांच्या मधील फरक त्यांनी समजावून सांगितला.बिबटे शक्यतो त्यांच्या पेक्षा उंचीने कमी असना-या जनावरे व लहान मुलांना लक्ष करतात असे सांगितले.या वेळी रेणुकादेवी विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब शिंदे,विद्यार्थी,शिक्षक व वन कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment