पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
तालुक्यातील कासार पिपंळगाव ते पाथर्डी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.गेल्या दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या खड्यात पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्डा दिसून येत नाही.येथील प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नसल्याने रस्त्यावरुन जाताना मानसिक ञास सहन करावा लागत आहे.तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो.रस्त्याने विद्यार्थी,शिक्षक,मुले,व्यापारी दररोज प्रवास करतात.तसेच काही वेळा छोटे मोठे अपघातही घडलेले आहेत.प्रशासनाने खड्डावर कमीतकमी खड्यात मुरूम भरुन मजबुतीकरण करणे गरजेचे आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालकांना दररोज चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Post a Comment