चांदेकसारे (वार्ताहर )
आगामी विधानसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी,आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी शिर्डी पोलिस व शसस्त्र सिमा सुरक्षा दल जवानांनी आज सायंकाळी पोहेगाव गावातुन संचलन केले.सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.पोहेगाव हे अहमदनगर जिल्ह्यात संवेदनशील गाव म्हणुन ओळखले जाते.गावाला पुर्व पाश्वभूमी असल्याकारणाने कायदा, सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासह अवैध व्यवसायांना प्रतिबंध करण्यासाठी संचलन झाले. एकाचवेळी सुमारे 150 पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला. 'निर्भयपणे मतदान करा', 'कोणत्याही मोहाला बळी पडू नका', असे आवाहन करण्यात आले. संचलनामध्ये वाहनांच्या ताफ्यासह पोलिस निरीक्षक दिपक गंधाले,रावसाहेब शिंदे ,नानासाहेब शेंडगे,शसस्त्र सिमा सुरक्षा दलाचे अधिकारी व जवानांनी सहभाग घेतला

Post a Comment