हवा गडाखांची विजयाचा अंदाज दावा मुरकुटेंचा ! भल्या - भल्यांची पाचावरधारण !
नेवासा,(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यात आज गुरुवार (दि.२१) रोजी निवडणूकीच्या रणांगणात उतरलेल्या पहीलवांनाच्या विजयाचा फैसला मतदान यंञातून स्पष्ट होणार आहे कोण बाजी मारणार कोण चितपट होणार याकडे राज्याचे लक्ष लावून आहे.मतमोजणीच्या आधी एक्झिटपोलमुळे महाराष्ट्रात अनेकांची पाचावरधारण बसली आहे.हवा एकाची अंदाज दुसऱ्याचा एक्झिटपोलने वर्तविल्यामुळे उमेदवार गॅसवर आसतांना याचा फैसलाच आज होणार आहे.
नेवासा मतदार संघाच्या निवडणूक निकालाकडे राज्याचे लक्ष लावून आहे कारण विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अपक्ष लढत दिली.अपक्ष उमेदवार आसतांना तालूक्यात जो - तो त्यांच्या विजयाची खाञी देत आसतांना एक्झिटपोल माञ भाजपाच्या उमेदवाराची ग्वाही देत आसल्याने या मतदार संघात कोण बाजी मारणार याची चर्चा होत आसून या निकालाच्या फैसल्याकड अनेक राजकिय निरिक्षकांच्या नजरा लागून आहेत.


Post a Comment