नेवासा मतदार संघात खासदार डॉ सुजय विखे सभा देईनात !

ग्रामविकासमंञी ना मुंढे कडे आमदार मुरकुटेंची विनवणी ! 


नेवासा,(प्रतिनिधी)
स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघात १७ उमेदवार एकमेंकांच्या विरोधात उभे ठाकले आसून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार माजी आमदार शंकरराव गडाख व भाजपाचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यातच खरी ही निवडणूक होत आहे.विखे - गडाखांचे मागिल काळातील हाडवैर संपुर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे माञ नविन पिढीत हा वाद शमला आहे.शंकरराव गडाख त्यांच्या क्रांतिकारी पक्षाकडून मतदार संघात एकाकी झुंज देत आसून भाजपाचे उमेदवार मुरकुटे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंञी देवेंद्र फडणविस,ग्रामविकासमंञी पंकजा मुंढे यांची जाहीर सभा मतदार संघात झाली.माञ नगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे नेवाशात सभा आयोजित करुनही देत नाहीत ताई दादांना माझ्या मतदार संघात सभा देयला सांगा अशी विनवणी करण्याची वेळ भाजपाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांनी पांढरीपूल येथील जाहीर सभेत मुंढे यांच्याकडे करावी लागल्याने विखे - गडाखांच्या नातेसंबंधाची प्रचिती मतदारांतील जनतेत चर्चेचा विषय झाला.
   या प्रश्नावर उत्तर देतांना ग्रामविकासमंञी ना मुंढे खासदार विखेंना म्हणाल्या की, मला शेवगांव - पार्थर्डी मतदार संघात लक्ष देयला लावता तुम्ही मुरकुटेंना सभा द्या, असे त्या म्हणाला त्यावर खासदार विखे म्हणाले ताईंचा आदेश मानून मी सोनईत सभा घेईल असे सांगितल्यामुळे मुंढे म्हणाला खापर माझ्यावर का फोडीना पण सभा घ्या एक - एक आमदार निवडून देवून पुन्हा देवेंद्र फडणविसांनाच मुख्यमंञी करायचे आसून महाराष्ट्रात विकासाची गंगा आणायची आसेल्याच्या यावेळी त्यांनी सांगितले.
  शेवगांव - पार्थर्डी मतदार संघात भाजपाच्या उमेदवार मोनिका राजळे आहेत.तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप ढाकणे त्यांच्या विरोधात लढा देत आहेत.ढाकणे हे माजी केंद्रीयमंञी बबनराव ढाकणे यांचे चिरंजीव आहेत ते वंजारी समाजाचे आहेत तेथे मुंढेंकडे वेगळ्या नजरने तर नेवासा मतदार संघात डॉ विखे यांच्याकडे नातेसंबंधामुळे विखे सभा देत नसल्याचे पडद्या आडच्या चर्चेमुळे वेगळे चर्चेचे गुऱ्हाळ मतदारांत सुरु आहे. मुरकुटे यांच्या विकास दिंडीचा सांगता सभारंभ सोनईत होणार होता भाजपाकडून या समारंभास खासदार डॉ विखे येणार आसल्याचा प्रचार करण्यात आला पण दक्षिणेत खासदार विखे गुंतल्याने आमदार मुरकुटे विखेंच्या भूमिकेमुळे धास्तावल्याचे दिसून येत आसल्यामुळे थेट राज्याच्या ग्रामविकासमंञी मुंढें पुढे खासदार विखे यांनी नेवाशात सभा घेण्याची विनवणी आमदार मुरकुटेंना करावी लागल्याचे बोलले जात आसून यामुळे नातेसंबंध व जातीमुळे या सभा अडकत आसल्याचे मनसुबे पारावरच्या गुऱ्हाळ चर्चेत जोरदारपणे सुरु आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget