आल्या गेल्याचा आदर आणि डोक्यावर पदर तीच खरी ठरेल इंडियन मदर-दीपालीताई पुणेकर
नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा तालुक्यातील मुकींदपूर चारी क्रमांक तीन जवळ असलेल्या श्रीराम साधना आश्रमात कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने महिला प्रबोधनकार हभप दीपालीताई पुणेकर यांच्या आयोजित किर्तन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.भारतीय संस्कृतीची जपवणूक व जगामध्ये आपल्या महान संस्कृतीची शान वाढविण्याची मोठी जबाबदारी महिलांवर आली असून संस्कृतीच्या जपवणूकीसाठी ..आल्या गेल्याचा आदर ..जिच्या डोक्यावर पदर ..तीच खरी ठरू शकेल इंडियन मदर असे प्रतिपादन युवा कीर्तनकार व समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण सौ.दिपालीताई पुणेकर यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी हरिभक्त परायण दीपालीताई पुणेकर यांनी भारतीय संस्कृती व सद्या बिघडत चाललेली युवा पिढी यावर भर देत प्रबोधन केले.धर्म व संस्कृती बरोबरच त्यांनी देशभक्ती विषयी जनजागृती केली त्या म्हणाल्या की प्रत्येक ग्रंथाने आपल्या तत्व दिले गाथाने आम्हाला उपदेश दिला तरी देखील आजच्या महिला सौभाग्य असलेले कुंकू नीट लावीत नाही डोक्यावर पदर घेत नाही,आल्या गेल्याचा आदर व डोक्यावर पदर जी घेते तीच खरी आजची इंडियन मदर आज ठरू शकेल,महान असलेली भारतीय संस्कृतीची शान वाढविण्यासाठी चांगल्या आचरणाचा अवलंब करा,आईवडिलांचा सन्मान करा असे आवाहन त्यांनी केले
महंत सुनीलगिरी महाराज,रामायणाचार्य हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे,महंत गोपालानंदगिरी महाराज, हभप के.एम.बाबा फाटके,चंद्रकांत घोडके,संतसेवक गोसावी बाबा,पोपटराव निपुंगे,शिवाजीराव वाघे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिलीच किर्तनसेवा दिल्याबद्दल दीपालीताई पुणेकर यांचा यावेळी महंत सुनीलगिरी महाराजांच्या हस्ते गौरव करण्यात आला.उपस्थित भाविकांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने केसरी दुधासह महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment