चंद्रशेखर बावनकुळेंचा पत्ता कट; भाजपाकडून सावरकरांना उमेदवारी

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
भाजपाने कामठी मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम ठेवला. उमेदवारी भरण्याच्या काही तासआधी अचानक  नावाची घोषणा करत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का दिला. भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांचा उमेदवारीचा पत्ता कट करत टेकचंद सावरकरांना कामठीतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बावनकुळे समर्थक संतप्त झाले आहेत.

बावनकुळे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांना उमेदवारी मिळेल, असेही बोलले जात होते. बावनकुळे यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. मात्र, त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत आहे. त्यांच्या ऐवजी भाजपनं टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात झालेल्या नेत्याच्या प्रचंड इनकमिंगमुळे भाजपातील अनेक निष्ठावंताची उमेदवारी गेली आहे. यात खडसे, तावडेंपासून ते अनेक विद्यमान आमदारांचाही समावेश आहे. राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळ ठेवले. अखेर यादीची वाट बघून थकलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं भाजपचे अधिकृत उमेदवार टेकचंद सावरकरांसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार असल्याचं दिसत आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget