एकतारी भजनाने भाविक ही तल्लीन
नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा येथील मारुतीनगर च्या एकतारी भजनी मंडळाचा नवरात्रात राष्ट्रीय ऐक्य जोपासण्याचा प्रयत्न केला जात असून जुन्या एकतारी भजनाने नवरात्रात रंगत आणली जात आहे एकतारी भजनाची जुनी परंपरा पुन्हा नव्या जोमाने पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न नेवासा येथील वास्तू शिल्पकार राजेंद्र परदेशी यांनी केल्याने अनेक जातीधर्माचे गायक वादक यानिमित्ताने एकत्रित आल्याचे दिसत आहे.
नेवासा येथील दुर्गादेवी मंदिरामध्ये नवरात्र निमित्त या एकतारी भजनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.यामध्ये संत कबीरांच्या दोहया सहित विठ्ठलाच्या गाण्याबरोबरच सर्व देवतांची व संतांची भजने सादर केली जातात या भक्तीगीत भजनाच्या माध्यमातून गायक वादक ही तल्लीन होऊन जातांना दिसत आहे.या एकतारी भजनी मंडळामध्ये वास्तूशिल्पकार राजेंद्र परदेशी हे स्व:त टाळ हातात घेऊन आपल्या सुरेल आवाजात भजने गातात तर बापूसाहेब ओहोळ,अशोक आढागळे,शिवाजी गायकवाड, वसंत कातकाडे हे खंजीरी वादन,अशोक वैद्य काडीची खंजीरी वादन, सागर कातकाडे,संजय वाघडकर,श्रीधर पवार, झांज वादक,निवृत्ती जमधडे हार्मोनियम वादक त्यांना उत्कृष्ट साथ देतात यामुळे एकतारी भजनात खरी रंगत येत असल्याचे दिसून येते.
सत्तर वर्षीय रहीमखान पठाण हे बुजुर्ग तर गेल्या ३५ वर्षांपासून एकतारी भजनांमध्ये नाल,ढोलकी,पखवाज वाजविण्याचे काम करीत आहे.देवाचे वास्तव्य चराचरात असून तो मनुष्य देहात भक्तीच्या रूपाने अवतरला आहे त्यामुळे विविध संतांची भक्तिगीते व भजने गातांना वेगळा आनंद प्राप्त होतो असे मत व्यक्त करतात.

Post a Comment