खाजगी वृत्तवाहिनीच्या रणसंग्राम कार्यक्रमात काँग्रेस शिवसेनेत राडा

शिवसेना महिला पदाधिकारी बद्दल अपशब्द वापरल्याने तणाव 

संगमनेर (प्रतिनिधी) 
एका खाजगी वृत्तवाहिनीचा रणसंग्राम हा निवडणुकीवर आधारीत कार्यक्रम सुरू असतांना महिला शिवसेनेचे पदाधिकारी बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल राडा झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11  वाजता घडली, रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, 
या बाबत अधिक अशी की, सध्या सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे, विविध वृत्तवाहिनी राजकीय चर्चा घडवून आणत आहे, येथील मालपाणी हेल्थ क्लबवर एका खाजगी वृत्तवाहिनीचा रणसंग्राम हा कार्यक्रम सुरू होता, काँग्रेस, राष्ट्रवादी ,शिवसेना व भाजप यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते, स्थानिक राजकारणावर चर्चा सुरू असताना शिवसेनेचे महिला पदाधिकारी आपले विचार मांडत होत्या पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे व जिल्हापरिषद सदस्य रामहरी कातोरे या दोघांनी सदर महीले विषयी काही अपशब्द वापरले, जवळच बहलेल्या सदर महिलेच्या पतीने या बाबत विचारणा केली असता त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली, यामुळे उपस्थित काँग्रेस व शिवसेना पदाधिकारी यांचेत गोंधळ वाढत गेला, हा कार्यक्रम सुरू असतांना कार्यकर्ते पदाधिकारी यांचेत जोरदार वाद होवून घोषणा बाजी झाली, गावातील इतरही कार्यकर्तेना याची माहिती मिळताच तेही घटनास्थळी पोहचले, काँग्रेस शिवसेना भाजप कार्यकर्त्यांचा जमाव जमा झाला, पोलिसही आले त्यांनी जमावाला शांत केले, महीलेविषयी अपशब्द वापरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शहर पोलिस ठाण्यात युतीचे पदाधिकारी एकत्र आले, अखेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे व जिल्हापरिषद सदस्य रामहरी कातोरे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम प्रकार घडल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे, काँग्रेस व युतीचे पदाधिकार्या मधील अंतर्गत संघर्ष वाढला असून पुढे हा वाद कोणते वळण घेतो ते पाहायला मिळणार आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget