राहाता मतदार संघात विखे विरुद्ध तांबे?

काँग्रेस कडून विखेंच्या राजकीय हस्तक्षेपाला कात्री 

संगमनेर (प्रतिनिधी)
निवडणूकीसाठी अर्ज भरण्यास केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहे, काँग्रेसने राहात मतदार संघात विखे विरोधात आ, डॉ, सुधीर तांबे यांना उतरविण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे, 
  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मधील अंतर्गत संघर्ष सध्या टोकाला गेला आहे, भाजपात प्रवेश केल्यापासून विखेनी संगमनेरात अधिक लक्ष देण्यास सुरूवात केली आहे, परिणामी थोरातांची डोकेदुखी वाढली आहे, राहाता मतदार संघात विखे पाटील विरोधात कुणाला उमेदवारी द्यायची याची काँग्रेस पक्षात मोठी चर्चा झाली, अखेर या मतदारसंघात विधान परिषद सदस्य नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू झाली असून गुरुवारी अथवा शुक्रवारी उमेदवारी दिली दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, संगमनेरला विखे कुणाच्या डोक्यावर हात ठेवतात, त्यावर हा निर्णय घेतला जाणार आहे , तर राहात्यात विखे व संगमनेर थोरात या दोघांची मतदार  मोठी मजबूत पकड आहे, मात्र संघर्ष टोकाला गेल्याने एकमेकांना शह देवून शड्डू ठोकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, युतीचे उमेदवार निश्चित होण्यापूर्वी संगमनेर तालुक्यात प्रचार सुरू करण्यात आला आहे,गावोगाव बैठका सुरू असून शहरातून फेऱ्या काढून जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहे, विरोधकांना संपूर्ण मदत विखेकडून सुरू आहे, त्याचीच यंत्रणा काम करत आहे, वरवर साधी सोपी वाटणारी निवडणूक आतून मात्र कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे, अंतर्गत संघर्ष कुठल्या स्तराला जातो ते पाहावे लागणार आहे , या वादात कार्यकर्ते मात्र भरडले जात असून विखे थोरातांना त्याचे घेणे देणे नाही, आजवर या दोघा नेत्यांनी स्वताचे अस्तित्व टिकविण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकार्याचा पुरेपूर वापर करून घेतला आहे, जून्या अभ्यासु पदाधिकार्याना यांचा दांडगा अनुभव आहे, काम झाल्यावर थोरात विखेंनी कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून दिले आहे, अनेकांचे आयुष्य बरबाद झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत, आतून एकमेकांना मदत केली जात आहे, तिसरा कोणी येवू नये यासाठी हे दोघे मातंबर नेते वेळोवेळी भावनिक मुद्दाला हात घालून आपली पोळी भाजून घेत आहे, विखे भाचपात तर दुसरीकडे थोरात काँग्रेस मध्ये असले तरी आतून ही अंतर्गत सेटिंग आहे, हे नव्या नवख्या कार्यकर्त्याना कळत नाही, अकोल्यात मधुकर पिचड वैभव पिचड, कोपरगावला कोल्हे यांची जबाबदारी विखेनी घेतली आहे, नगर जिल्ह्यात थोरात विखे शिवाय राजकारण चालत नाही, कुठलाही निर्णय घेतला जात नाही, एकूणच निवडणुकीत दाखवला जाणार विरोध हा स्वताचे अस्तित्व टिकविण्यासाठी आहे, राहाता मतदार संघात डॉ तांबे लढणार असले तरी संगमनेर ला कुणाला उमेदवारी दिली जाणार यावर गणित अवलंबून आहे, थोरात विखे वादाला संस्कृत तरुणांनी बळी पडू नये यासाठी काहीचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget