विखे गटाचे डॉ संजय ढवळेंनी केला समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

पक्षांतर : हळगावचे उपसरपंच अशोक रंधवे ही राष्ट्रवादीत 

जामखेड | प्रतिनिधी 
जामखेड तालुक्यातील हळगाव येथील विखे समर्थक गटातील लोकप्रिय युवा नेते डॉ संजय ढवळे व हळगावचे उपसरपंच अशोक रंधवे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

हळगाव ग्रामपंचायतवर सध्या विखे समर्थक जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांच्या गटाची सत्ता आहे. त्यांच्याच गटात आता उभी फुट पडली असून उपसरपंच अशोक रंधवे यांनी सरपंच अनिताताई सुशेन ढवळे यांचे मोठे दिर डॉ संजय ढवळे यांच्या नेतृत्वाखाली बंडाचे निशाण फडकावत राष्ट्रवादीत आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश केला. आता एकाच घरात दोन पक्षांचे नेते पहावयास मिळणार आहेत. जेष्ठ नेते किसनराव ढवळे, सरपंच अनिताताई सुशेन ढवळे, युवा नेते धनंजय ढवळे हे विखे गटात अर्थात भाजपात कायम राहणार असून डॉ संजय ढवळे मात्र राष्ट्रवादीच्या गोटात दिसणार आहेत. डॉ संजय ढवळे यांच्या बंडामुळे हळगावसह हळगाव पंचायत समिती गणातील अनेक गावांमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. डॉ संजय ढवळे हे हळगाव ग्रामपंचायतीच्या राजकारणात किंगमेकर म्हणून नेहमी महत्वाची भूमिका बजावत असतात.दरम्यान उपसरपंच अशोक रंधवे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे दलित समाज एकगठ्ठा राष्ट्रवादीच्या पाठीशी एकवटणार असल्याचे आता बोलले जात आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget