संगमनेर तालुक्यात 11 उमेदवारांचे 20 अर्ज दाखल

काँग्रेस, शिवसेना,मनसे बसपा सह अपक्षांचा भरणा

संगमनेर (प्रतिनिधी)  
गेली आठ दिवस उत्कंठा लागून राहिलेल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी शेवटच्या दिवशी एकूण 11 उमेदवारांनी 20 अर्ज दाखल केले आहे, 
कोण कोण अर्ज भरतो, कोणी बंडखोरी करतो का अशी चर्चा होती, प्रत्यकक्षात थोरात विखेंनी आतून हात मिळवणी केल्याचे उघड झाले आहे, बरीच चर्चा झाली तरी दखल पात्र फारश्या घडामोडी झाल्या नाहीत, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी प्रदेशाध्यक्ष आ बाळासाहेब थोरात, शिवसेना भाजप महायुती साहेबराव नवले, (4अर्ज)मनसे शरद नामदेव गोर्डे, बसपा सुर्यभान बाबूराव गोरे(2अर्ज),वंचित बहूजन आघाडी बापूसाहेब भागवत ताजणे, बहूजन मुक्ती पार्टी संपत मारूती कोळेकर, यांनी पक्षाकडून तर अपक्ष अविनाश हौशिराम भोर, कलिराम बहिर पोपळघट, सौ. शोभा संजय फड, बापु रणधीर आदिचा समावेश आहे, आघाडी, महायुती वगळता इतर उमेदवार दखल घेण्याजोगे नाही, ही निवडणूक एकतर्फी होईल यासाठी काळजी घेतली गेल्याचे स्पष्ट झाले, तालुक्यातील 28गावे राहाता मतदार संघात, तर पठार भागातील बोटा, घारगाव व परिसर अकोले मतदान संघाला जोडला गेला आहे यामुळे आ. थोरातांची भूमिका निर्णायक ठरणार आहे, यात शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संजय फड यांनी बंडखोरी केली पण स्वतः अर्ज दाखल न करता पत्नीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे, यामुळे ते अर्ज ठेवतात का माघारी घेतात हा विषय महत्त्वाचा ठरणार आहे  राहाता मतदार संघात काँग्रेस आघाडी कडून शरद थोरात यांनी विखेच्या विरोधात अर्ज दाखल केला असला तरी ते आ, थोरातांचे कार्यकर्ते आहे, विखेंसाठी थोरातांनी दुबळा उमेदवार देण्याची पुर्ण काळजी घेतली, एकमेकांना सहकार्य करत राजकारण केले गेले आहे, 
काँग्रेस, शिवसेना  ,बसपा, वंचित बहूजन आघाडी, बहूजन मुक्ती पार्टी, व अपक्ष अशा उमेदवारांचा समावेश आहे, आता कोणता उमेदवार अर्ज माघारी घेणार हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे,

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget