पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
निवडणुक आयोगाच्या माध्यमातून जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मतदारामध्ये जनजागृती होण्यासाठी स्वीप२ लोकशाहीचा उत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशनानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील निवडणूकीत मतदारांनी शंभर टक्के भुमिका बजवावी,त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदारामध्ये जनजागृती होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थी,सामान्य नागरिक व शिक्षक या उपक्रमात सहभाग होताना दिसत आहेत.या उपक्रमात निबंध,चिञकला,वक्तृत्व,घोषवाक्य,पोस्टर,मतदान प्रबोधनात्मक व्हीडीओ,लघुपट निर्मिती,स्पर्धा बरोबरच मतदान जनजागृती उपक्रम राबवले जात आहे.गावागावातून चांगला प्रतिसाद या उपक्रमास मिळत आहे.

Post a Comment