उद्योजक बाबासाहेब ढाकणे यांनी शेवगाव मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील काटेवाडी येथील रहिवाशी तसेच उद्योजक बाबासाहेब ढाकणे यांनी शेवगाव मतदार संघात अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे. गेली दोन वर्षापासुन पाथर्डी व शेवगाव मध्ये केलेल्या सामाजिक कार्यामुळे जनतेच्या आग्रहानंतर त्यांनी शेवगांव पाथर्डी विधानसभेसाठी गोरगरीब जनतेच्या वतीने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.अनेक  गावोगावातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.तसेच तालुक्यातील अनेक गावातील   जनतेचा आशिर्वाद घेत आहेत. उद्योजक बाबासाहेब ढाकणे यांची सामाजिक तळमळ व स्वच्छ प्रतीमा व नवीन चेहरा म्हणून त्यांनी शेवगांव पाथर्डी विधानसभा मतदार संघातुन अपक्ष उमेदवारी करावी म्हणून जनतेचा प्रचंड पाठींबा मिळत आहे. गावागावामध्ये जाऊन वयस्कर आणि तरुणांना माझी उमेदवारी तरुणांना रोजगार मिळावा म्हणून औद्योगिक  वसाहत शेवगांव व पाथर्डी तालुक्यात सुरु व्हावी तसेच पाथर्डी शेवगांव मधील जनतेस शुद्ध पेयजेल मिळावे, तसेच पाथर्डीच्या पुर्व भागास शेतीसाठी पाटपाणी मिळावे म्हणून माझी उमेदवारी आहे. माझ्यासाठी मी खुप केले.माझ्यासाठी मला काही करायचे नाही आता यापुढील माझा लढा फक्त शेवगांव पाथर्डीच्या जनतेच्या हितासाठी राहील असे मत उद्योजक बाबासाहेब ढाकणे यांनी व्यक्त केले असल्यामुळे उद्योजक ढाकणे हे तरुणांना व जनतेला आपलाच आपल्यासाठी निस्वार्थीपणे झटणारा माणुस वाटत असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीने शेवगांव पाथर्डी मतदार संघात अपक्ष रुपाने नवीन चांगला पर्याय निर्माण झाला आहे.असे मत बाबासाहेब ढाकणे समर्थकांनी व्यक्त केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget