शेवगाव विधानसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज शेवगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला.
यावेळी आ.राधाकृष्ण विखेपाटील,पालक मंञी राम शिंदे,माजी खासदार दिलीप गांधी तसेच इतर मान्यवर तसेच दोन्ही तालुक्यातील नेते कार्येकर्तै मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव येथील छञपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.आ.मोनिका राजळे यांनी अगोदर ११.१० शुभ मुहूर्तावर अर्ज दाखल केला.व त्यानंतर मिरवणूकीने येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी कार्येकर्तानी भगव्या पताका,भगवे पंचे गळ्यात घालून जोरदार घोषणाबाजी शेवगाव शहरातून केली.तसेच कार्यकर्त्यांनी कासार पिपंळगाव या आ.मोनिकाताई राजळे यांच्या मुळगावातून मोटार सायकल रॕली शेवगाव शहरापर्यत काढली.या रॕलीत तरुण युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी शेवगाव शहर अर्ज दाखल करायला आलेल्या आ.मोनिकाताईच्या कार्यकर्तामुळे भाजपमय झाले होते.
यावेळी पाथर्डी शेवगाव तालुक्यातील तरुण कार्येकर्तै,ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment