करजगांव
येथील ग्राम दैवत जगदंबा देवी मंदिरात नवरात्री निमित्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील भाविक येत आहे.ग्रामस्थांच्या व बाहेरील भाविकांच्या सहकार्यातून नवरात्रीमध्ये दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. अनेक महिला नवरात्री बसल्या असून देवीची मनोभावे सेवा करत आहे.स्वामी समर्थ केंद्रांच्या सहकार्यातून दररोज दुर्गासप्तसतीचा पाठ केला जात आहे.
देवी मंदिरात घटस्थापना करून नवरात्रास उत्साहात सुरुवात करण्यात आली.गावतील तरुणांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथून पायी चालत मशाल ज्योत आणली होती. मशाल ज्योतीचे वाजत- गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली.महिलांनी औक्षण करून ज्योतीचे स्वागत केले होते. करजगांव परिसरातील व नवरात्रीमध्ये कामानिमित्त व बाहेरगावी असलेले भाविक दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतात.अनेक महिला मंदिरात नवरात्री बसत असतात.सातव्या माळेस परिसरातील भाविक दर्शनासाठी मोठया संख्येने येत आहे. दानशुरांच्या सहकार्यातून सेवीचे मंदिराचे काम झाले असून उर्वरीत कामासाठी व सुशोभिकरण आणखी देणगीची गरज आहे.


Post a Comment