विसापूर
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात दि. ४ ऑक्टोबर अखेर विस उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना भाजपाची उमेदवारी मिळाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोन रहाणार या चर्चांनाही पुर्ण विराम भेटला आहे.घनश्याम शेलार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.अनुराधा नागवडे या अपक्ष लढणार का? हे सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतात किंवा नाही त्यानंतरच स्पष्ट होणार आहे.भाजपाचे बबनराव पाचपुते व राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांच्यात लढत होणार हे मात्र निश्चित झाले आहे.आमदार राहुल जगताप यांनी अचानक निवडणूकीतुन माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच भांबावून गेले आहेत.आ.जगताप यांच्या माघारीमुळे शेलार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारीची लॉटरी लागली आहे.शेलार यांच्या आक्रमक कार्यशैली मुळे त्यांना आ.जगताप यांच्या सहकार्याने नगर तालुक्यातील वाळकी,चिचोंडी पाटील गटात व श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे,कोळगाव,मांडवगण व आढळगाव या कुकडी पट्ट्यातील जिल्हा परिषद गटांमधुन चांगला प्रतिसाद मिळु शकतो.अनुराधा नागवडे या निवडणुकीत नसतील तर त्यांची व राजेंद्र नागवडे यांची मदत शेलार यांना बेलवंडी व काष्टी जिल्हा परिषद गटातही चांगला जनाधार मिळु शकतो.तसे झाल्यास शेलार यांना उमेदवारी बरोबरच विजयाची लॉटरी लागू शकते. मात्र नागवडे यांची उमेदवारी कायम राहिल्यास विजयाचे गणित पुर्ण पणे बदलु शकतात.आ.जगताप यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूकीत पाचपुते यांचा विजय निश्चित झाला असल्याचे भाजपाचे कार्यकर्त्यांना वाटत अाहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची निर्माण झालेली हवा पहाता शेलार यांना पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांनी सोप्यात घेऊन चालणार नाही.
नगर तालुक्यातील यावेळी कोणताही प्रभावी उमेदवार नसल्याने या वेळी श्रीगोंदा तालुक्यातील उमेदवारांना नगर तालुक्यातील गावांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ उमेदवारांचा यादी
१.बबनराव भिकाजी पाचपुते(भाजप),
२.प्रतिभा बबनराव पाचपुते(भाजप),
३.सुनील शिवाजी उदमले(अपक्ष),
४.सुनील लक्ष्मण ओहळ(बहुजन समाज पार्टी),
५.हरिश्चंद्र पाटीलबुवा पाचपुते(अपक्ष),
६.अनुराधा राजेंद्र नागवडे(अपक्ष),
७.घनश्याम प्रतापराव शेलार(राष्ट्रवादी काँग्रेस),
८.टिळक गोपीनाथ भोस(संभाजी ब्रिगेड पार्टी),
९.मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर(वंचित बहुजन आघाडी),
१०.प्रविण मोहनराव मांडे(अपक्ष),
११.अण्णासाहेब सीताराम शेलार(अपक्ष),
१२.रत्नमाला शिवाजी ठुबे(अपक्ष),
१३.विनोदसिंग महादू परदेशी(प्रहार जनशक्ती पक्ष),
१४.तात्याराम बलभीम घोडके(बहुजन मुक्ती पार्टी),
१५.प्रमोद बाजीराव काळे(अपक्ष),
१६.राजेंद्र निळकंठ नागवडे(अपक्ष),
१७.नंदू श्रावण ससाणे(अपक्ष),
१८.बाळू आप्पा जठार(भारतीय शेतकरी कामगार पक्ष),
१९.दत्तात्रय तान्हाजी आडबले(अपक्ष),
२०.दादा श्रीपती शिरवाळे (अपक्ष)

Post a Comment