विभागीय कबड्डी स्पर्धेला त्रिमूर्तीनगर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

१४ वर्षीय मुले मुली मिळून १६८ खेळाडूंचा सहभाग

नेवासा,(प्रतिनिधी)
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान यांच्यात संयुक्त विद्यमाने शालेय विभागीय १४ व१९ वर्षे मुले व मुलींच्या आयोजित कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विभागातून सोलापूर पुणे अहमदनगर या जिल्हयातीलय शाळांचे १६८ खेळाडू सहभागी झाले आहे. खेळाच्या माध्यमातून जीवनात उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करा असे आवाहन साहेबराव घाडगे पाटील यांनी यावेळी बोलतांना केले.
      या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व नेवासा पोलीस  स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या हस्ते करण्यात आला. शालेय विभागीय स्पर्धेचा शुभारंभ सोलापूर शहर विरुद्ध सोलापूर ग्रामीण या संघाच्या सामन्याने करण्यात आला.या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात १४ वर्षीय गटात  ८४ मुले व ८४ मुली अशा १६८ खेळाडूंचा सहभाग आहे.या स्पर्धेत निवड चाचणीसाठी ३५ खेळाडू सहभागी झाले आहेत
     या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून चांगले प्रदर्शन करावे खिलाडी वृत्ती अंगिकारली तर चांगल्या उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धा पार पडतील असे वर्तन करावे असे आवाहन केले.स्पर्धेचे आयोजक साहेबराव घाडगे पाटलांनी खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून यश संपादन करत आपल्या शाळे बरोबरच देशाचे नाव उज्वल करावे 
व हया स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची व्यवस्था चांगल्या प्रकारे त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या वतीने केली जाईल अशी ग्वाही दिली
यावेळी झालेल्या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अशोकराव गाडे सर यांनी केले प्राचार्य सोपानराव काळे यांनी उपस्थित खेळाडूंचे आभार मानले.
    या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी कबड्डी स्पर्धेचे राज्य मार्गदर्शक व जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, दादासाहेब घाडगे पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सोपानराव काळे,त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सचिन कर्डीले,त्रिमूर्ती संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दत्तात्रय वांढेकर,पत्रकार सुधीर चव्हाण,स्पर्धेचे आयोजन क्रीडा शिक्षक महादेव काकडे,बाबासाहेब तांबे, मनोहर शेजुळ,पर्यवेक्षक संजयसिंह चौव्हान,प्राचार्य भारती,उपप्राचार्य अरविंद देशमुख, क्रीडा विभाग प्रमुख क्रीडा शिक्षक संतोष निंबाळकर,गणेश शिंदे,सतीश मोरकर,किरण मोरकर,पापा शेख,अशोक पानखडे,सरोदे सर,क्रीडा शिक्षक साहेबराव दाणे,छबुराव काळे यांच्यासह 
खेळाडू व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget