समर्थकांनी दिला जय हरी.. लई ..भारी..चा नारा
नेवासा,(प्रतिनिधी)
नेवासा तालुका मतरदार संघाचे भाजप व मित्र पक्षाचे विद्यमानआमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नवरात्रातील पाचव्या माळीचा मुहूर्त शोधत शक्तीप्रदर्शन करीत गुरुवारी दि.३ ऑक्टोबर रोजी वाजत गाजत नेवासा तहसील कचेरीवर जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.जय हरी..लई ..भारी असा नारा समर्थकांनी दिला.यावेळी हजारो समर्थक मिरवणुकीत सहभागी झाले होते.राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही निघालेल्या मिरवणूकीत हजेरी लावली.
नेवासा येथील प्रयाग फर्निचर जवळ असलेल्या आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी १० वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला.ढोलताशांच्या गजरात फॉर्म भरण्यासाठी उघडया जीपवरून निघालेल्या रॅलीमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे स्व:त सहभागी होऊन आमदार बाळासाहेब मुरकुटे समवेत उपस्थित मतदार व्यापारी व नागरिकांना अभिवादन करतांना दिसत होते त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय काळे,भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,शिवसेनेचे बाळासाहेब पवार,शहरप्रमुख नितीन जगताप,प्रभाकर शिंदे,बाबासाहेब कांगुणे,नेवासा बुद्रुक चे माजी सरपंच दादासाहेब कोकणे,संभाजी ठाणगे, नगराध्यक्ष दत्तात्रय बर्डे,नगरसेवक सुनील वाघ,राजेंद्र मापारी,नितीन नागपुरे,रणजित सोनवणे, मुक्तारभाई बाबा मेंबर शेख,रशीदभाई ईनामदार,डॉ.सचिन सांगळे,दिनेश व्यवहारे,भारत डोकडे,निरंजन डहाळे,मनोज पारखे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.मळगंगादेवी मंदिरात जाऊन प्रथम श्रीफळ वाढवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर समोर एस.टी. स्टँड मार्गे श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणपती मंदिरात जाऊन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी श्रीफळ वाढवून दर्शन घेतले.
त्यानंतर खोलेश्वर गणपती चौकातून श्रीरामपूर रोड मार्गे नेवासा तहसील कचेरीवर गेले तेथे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शाहुराव मोरे व सहायक निर्णय अधिकारी तहसीलदार रुपेश सुराणा यांच्याकडे दाखल केला त्यानंतर नेवासा शहरातील औदुंबर चौकात
जाहीर सभा घेण्यात येऊन रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment