चांदेकसारे (वार्ताहर )
वयाच्या नव्वदीला असलेल्या आजोबांच्या शस्ञक्रियेसाठी अनेक रुग्णालयात नकार मिळाल्याने शेवटी हतबल झालेल्या जमदाडे कुटुंबाला कोपरगाव येथील डॉ प्रीतम जपे हे देवदुत ठरले आहे.डॉ प्रीतम जपे यांच्या प्रयत्नामुळे वयाच्या नव्वदीत असलेल्या रघुनाथ शंकर जमदाडे या आजोबांना पुन्हा नवसंजीवन मिळाले आहे. वयाच्या 90 व्या टप्प्यावर खुब्यावर शस्त्रक्रिया करण्यास अनेक ठिकाणी नकार मिळाला माञ शेवटी डॉ प्रीतम जपे यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली आणि शस्त्रक्रियेनंतर १५ दिवसात आजोबा चालायलाही लागले आहे. शेवटी म्हणतात ना डॉक्टर हे देव नाही पण देवापेक्षा कमीही नाही याची प्रचिती डॉ प्रीतम जपे यांच्या रुपात जमदाडे कुटुंबाला अनुभवयास मिळाल्याने मग डॉक्टरांनीही आपल्या रुग्णाच्या या यशस्वी शस्त्रक्रियेचे औचित्य साधुन डॉ प्रीतम जपे यांनी आजोबांचा सत्कार केला.
यावेळी रघुनाथ शंकर जमदाडे यांच्या आपल्याला इतर रुग्णालयात नकार मिळल्याने आपण हतबल झालो माञ देवदुत बनून समोर आलेल्या डॉ जपे यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली आणि मी तिसऱ्याच दिवशी चालायला लागलो असल्याचे सांगितले.
सध्या परिसरात आजोबाची आणि कर्तव्यदक्ष डॉ जपे यांची चर्चा होत आहे..
माझी वयाच्या 90 व्या वर्षी न होणारी खुब्याची शस्त्रक्रिया डॉ जपे यांनी त्यांच्या डॉक्टरेट अनुभवातून व त्यांच्या प्रयत्नातून ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली व मी 3 रया दिवशी चालायला लागलो ...व मला पहिल्यासारखे चालायला यायला लागले ,मी डॉ प्रीतम जपे यांचा मनापासून आभारी आहे
- रघुनाथ शंकर जमदाडे
ही शस्त्रक्रिया आजोबांच्या वयाने तशी अवघड होती माञ प्रयत्नार्थी परमेश्वर हे डॉक्टरांचे कामच आणि यात आजोबांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करता आली


Post a Comment