नगर जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी उपनेते अनिलभैय्या राठोड यांना विधानसभेवर घेवून लाल दिवा द्या ! शिवसैनिकांची मागणी

नेवासा, प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना बळ देवून हिंदुत्वाचा नारा ज्वलंत ठेवण्यासाठी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांना विधान परिषदेवर घेवून त्यांना लाल दिवा मिळाल्यास पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात शिवसैनिकांना ताकद मिळून सेनेचा झांजावात कायम ठेवण्यासाठी राठोड यांचे राजकिय पुर्नवसन करण्याची मागणी नेवासा तालूक्यातील शिवसैनिकांनी केली आहे.
  नगर जिल्ह्यात शिवसेनेचे नांव आले की,समोर अनिल राठोड नगर जिल्ह्यात दिसतात.हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा हुक्कमी एक्का म्हणून जिल्ह्यात राठोड त्यांच्याकडे पाहीले जाते. शिवसैनिकांना न्याय देणारे ते आसून महाराष्ट्रात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंञी झालेले आसतांना सेनेचा आवाज जिल्ह्यात दबलेला आसून राठोड यांच्या रुपाने त्यांना न्याय दिल्यास शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आसून जिल्ह्यात सेनेचा आवाज वाढविण्यासाठी राठोड यांना विधान परिषदेवर घेवून शिवसेना जिल्ह्यात नव्या जोमाने उभा राहणार आसल्याचेही शिवसैनिकांतून बोलले जात आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget