बंधारा फुटून झालेल्या नुकसानीची आशुतोष काळे यांनी केली पाहणी

चांदेकसारे(वार्ताहर ) 
कोळपेवाडी, शहाजापूर, कुंभारी, मढी - माहेगाव शिव आदी गावांमध्ये अतिवृष्टीमुळे व उमरावती नदीवरील दगडी बंधारा फुटून घारी व डाऊच बु. येथे झालेल्या नुकसानीची आमदार आशुतोष काळे यांनी पहाणी केली तसेच अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना धीर दिला.

सदर गावांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसून संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या असून घरांची देखील पडझड झाली आहे. आमदार आशुतोषकाळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना सोबत घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच झालेल्या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. मी तुमच्या सोबत आहे, धीर सोडू नका अशा शब्दात नुकसानग्रस्त नागरिकांना आमदार आशुतोषकाळे यांनी धीर दिला.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget