ईद ए मिलाद व अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात पोलीसांचे पथसंचलन

नेवासा, प्रतिनिधी
दंगा काबू योजनेअंतर्गत ईद ए मिलाद व अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात पोलीसांनी पथसंचलन केले.शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी या रूट मार्च चे नेतृत्व केले.
नेवासा शहरात दंगा काबू योजना व रूट मार्च प्रसंगीशेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या समवेत,नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे,शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण,सोनई पोलीस स्टेशनचे निरीक्षक सोनवणे,यांच्या समवेत एस.आर.पी.पलटण यांच्यासह ५० पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते.
नेवासा पोलीस स्टेशन पासून सुरू झालेला रूट मार्च हा मुख्य श्रीरामपूर रोडवरून नेवासा नगरपंचायत चौक,मुख्य पेठेसह,नेवासा शहरातील गल्ली बोळातून काढण्यात आल्याने सर्व नागरिकांचे लक्ष रूट मार्च ने आकर्षित केले होते.,

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget