देवगड येथील गुरुदत्त माध्यमिक विद्यालयात बालदिनी पंडित नेहरूंना अभिवादन

नेवासा,प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या गुरुदत्त माध्यमिक विद्यालयात बाल दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरूंना अभिवादन करण्यात आले यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी गुरूदत्त माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय नांगरे सर यांच्या हस्ते श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय नांगरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवनकार्य विषद करून बालदिनाच्या उपस्थित विद्यार्थी वर्गाला शुभेच्छा दिल्या.बाल दिनानिमित्त गुरुदत्त माध्यमिक व उच्च विद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे शिक्षक बाळकृष्ण गंधारे,संदीप नाईक,भरत मुराडे,रामसुंदर राशीनकर,दीपक वायकर, राजेंद्र थोरात,रंगनाथ रिंधे,नितीन कांबळे,ज्ञानेश्वर मेथे, मधुकर गवळी,किरण दारकर,अर्जुन ससे,गणेश आरगडे, संतोष भगत,कवीता गावडे,सपना शेलार यांच्यासह पालक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget