नेवासा, (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणूकीत शंकरराव गडाख विजयी होण्यासाठी नेवासा फाटा येथील ज्ञानेश सिन्नरकर व सौ मनिषा सिन्नरकर यांनी २१ हजार रुपये व खणानाराळांनी कोल्हापूरात येवून ओटी भरण्याच्या केलेल्या नवसपुर्तीची सिन्नरकर कुटूंबियांनी तुळजापूरात नवसपुर्ती केली. व पुन्हा कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला शंकररावांसाठी लालदिव्याची मागणी केल्याची माहीती सिन्नरकर कुटूंबियांनी यावेळी केली.
नेवासा फाटा येथील युवक कार्यकर्ते ज्ञानेश (माऊली) सिन्नरकर व त्यांच्या सौभाग्यवती सौ मनिषा सिन्नरकर यांनी शंकरराव गडाखांना विजयी होण्यासाठी प्रचार काळात मोठे सक्रिय होते.त्यांना विजयी होण्यासाठी मिञ मंडळ नात्यागोत्यांच्या जिवाच्या माणसांना चिन्ह सांगून मतदान करण्याचे आवाहन केले.निवडणूक झाल्यानंतर कट्टयावरच्या गप्पा रंगत गेल्या पुढे निकाल म्हणजे काट्टे की कट्टर आसल्याचे चिञ कट्ट्यावर रंगले गेले त्यामुळे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी लिन होवून गडाख विजयी होण्यासाठी २१ हजार रुपये देणगी व खणानाराळे ओटी भरण्याचा नवस केला गडाख विजयी झाल्यानंतर त्या नवसाची नवसपुर्ती शनिवार (दि. २) रोजी सिन्नरकर कुटूंबियांनी तुळजापूरात जावून केली गडाख यांनी अपक्ष निवडणूक लढवून सेनेला पाठिंबा दिला अन् लाल दिव्याची चर्चा सुरु झाली त्यामुळे पुन्हा गडाखांना मंञीपद मिळण्यासाठी आई जगदंबेला साकडे घातले आसल्याची सिन्नरकर यांनी सांगून दिवा मिळणारच आसल्याचा आशावादही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment