नेवासा पोलिसांकडून भर चौकात चोरांना 'सलाम' !

पोलिस निरिक्षकांच्या विश्वासावरच पोलिसांनी फिरवले पाणी!

राजेंद्र वाघमारे| नेवासा
 येथील पोलिस ठाण्यात नेमणूकीस आसलेल्या मुख्यियांचा त्यांच्या शिलेदारांवर आसलेला प्रचंड विश्वासच आता कुचकामी ठरत चालला आसून चक्क शिलेदार पोलिस दादाच चोरट्यांना भर चौकात मानसंन्मान देत 'सलाम' ठोकत आसल्याने नेवासा पोलिस 'चोर सोडून सन्याशाला फाशी' देण्याच्या सदरात कारभार करत आसल्याचा 'भासच' सध्या नेवासकरांना होत आसून आता जिल्हा पोलिस अधिक्षकांनीच पोलिस ठाण्याच्या खाकी वर्दीतील दादांची तपासनी करण्याची मागणी सुज्ञ नागरीकांतून व्यक्त केली जावू लागली आहे.
   नेवासा शहरासह नेवासा फाटा व परीसरात भर दिवसा सराईत दुचाकी चोर  येथील एका हॉटेलात बसून चोरीच्या दुचाक्यांचे सौदे करुन मौल्यवान दुचाक्या कवडीमोल किंमतीत  विकतांना दिसून येतात हे सर्वसामान्य जनतेला दिसत आसतांना पोलिसांना या चोरट्यांचा 'प्रताप' दिसून येत नसून पोलिसांनी तो उघड्या डोळ्यांनी पहाण्याची गरज निर्माण झाली आहे. माञ पोलिसांकडून तसे न होता नेवासा शहर व फाटा परिसरात दुचाकी चोऱ्या,घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यांना भर चौकात पोलिस दादांचा नमस्कार चमत्कार होत आसल्याने पोलिसांच्या भूमिकेवरच नेवासकरांचा विश्वास लोप पावत चालला आहे. पोलिस दादाच या चोरट्यांबरोबर 'चहाचा अस्वाद' घेत आसल्याने आता पोलिस अधिक्षकांनीच याकडे लक्ष घालून पोलिसांचेच स्टिंग ऑपरेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
  नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रणजित डेरे आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने कायदा व सुव्यवस्था संभाळण्याबरोबरच चोऱ्या,घरफोड्या व अवैद्ध धंद्यावर नियंञन ठेवत आसल्याचे दिसून येत आसतांना गल्ली बोळात मटका,जुगार पोलिसांच्या अर्थपुर्ण संबंधातून सुरु आसल्याचे दिसून येत आहे.
    अवैद्ध धंदे चौहीकडे हाऊसफुल्ल सुरु आसतांना आता शहरासह फाटा परीसरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.येथील दुचाकी चोरांचे जाळे जिल्हाभरात पसरलेले आसतांना काही दुचाकी चोर येथील एका हॉटेलात बसून चोरटे चोरीच्या दुचाकी गाड्यांची 'डिल' करत आसतात ! हे चोरटेही पोलिसांना परिचयाचे आसून पोलिस दादाच 'त्या' चोरट्यांबरोबर हॉटेलात बसून गप्पा ठोकत आसल्याने सर्व सामान्य जनतेतून पोलिसांच्या भूमिके बाबत आश्चर्याबरोबरच चिडही व्यक्त होतांना दिसत आहे. पोलिसच जर चोरांबरोबर भरचौकात गप्पा मारत आसल्याने सर्वसामान्यांनी 'न्याय' कोणाकडे मागायचा असा सवालही या निमित्ताने नेवासकरांच्या मनात घर करुन बसला आहे.दुचाकी चोऱ्या,घरफोड्या,राञीच्या वेळेस वाहनातील डिझेल चोरी हे प्रकार सध्या वाढलेले आसून पोलिस निरिक्षक डेरे यांचा त्यांच्या ताफ्यातील पोलिस दादांवर विश्वास आसल्याने हे दादाच आता मुख़्यियांना चुकांडा देवून 'मिलीभगतीतून' आपले उखळ पांढरे करुन घेतांना दिसून येत आहेत. दररोज दिवसागणिक गुन्ह्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चागली आसून नेवासा पोलिस ठाण्याच्या मुख्यियांच्या विश्वासावरच पाणी फिरले आहे तरी त्याची 'जाण' मुख्यियांना होत नसल्याने आता पोलिस अधिक्षकांनीच नेवासा पोलिस ठाण्याच्या कारभारावर लक्ष घालून दुचाकी चोरांच्या टोळीला जेरबंद करुन गुन्हेगारांना हिसका दाखविण्याची मागणी नेवासकरांतून होतांना दिसून येत आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget