नेवासा, प्रतिनिधी
नेवासा फाटा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र अधिवेशनाचा शानदार शुभारंभ शनिवारी सकाळी ११ वाजता ञिमुर्ती पावन प्रतिष्ठाण शैक्षणिक संकुल कन्या विभागाच्या सभागृहात मोठा दिमाखदार सोहळ्याला सुरुवात झाली.यावेळी राज्यभरातून ग्राहक पंचायतीच्या महीला - पुरुष पदाधिकारी मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने या अधिवेशनास उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन औरंगाबाद ग्राहक न्यायालयाच्या न्यायमुर्ती सविता बाराणे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न अयोग व ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ञिमुर्ती पावन प्रतिष्ठाण शैक्षणिक संकुलाचे सचिव मनिष घाडगे,पञकार राजेंद्र वाघमारे,किसनराव लवांडे,भालचंद्र पाठक,जिल्हाध्यक्ष विलास जगदळे,कारभारी गरड आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी औरंगाबाद ग्राहक न्यायालयाच्या न्यायमुर्ती सविता बाराणे बोलतांना म्हणाल्या की,ग्राहक पंचायतीचे कार्य कौतुकास्पद आसून या दोन दिवशीय अधिवेशाला महिला - पुरुष पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून कार्यक्रमाचा हेतू सफल केला.आज ग्राहकाला सुविधा मिळतांना वारेमाप खर्च करावा लागतो,वैद्यकिय सेवा तर खुप महागडी झाली आहे त्यामुळे या सेवेवर ग्राहकांचा विश्वासच राहीला नसून त्या दृष्टीने ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून अंकूश ठेवण्याचे काम होत आसून ग्राहकाला दर्जेदार व चांगल्या प्रतीची सेवा देण्यासाठी ही पंचायत सदैव ग्राहकांच्या पाठीशी आसल्याचा आशावादही यावेळी त्यांनी व्यक्त केला.


Post a Comment