उज्वल भवितव्यासाठी ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धा परीक्षेची तयारी ठेवावी-खासदार सदाशिव लोखंडे
नेवासा,(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी रेल्वेच्या यूपीएससीच्या परीक्षेत आय ई एस झालेल्या नेवासा येथील कु.काजल देशमुख यांच्या घरी जाऊन देशमुख परिवाराचे अभिनंदन करून सत्काराद्वारे गौरव केला.
उज्वल भवितव्यासाठी व जगाच्या स्पर्धेत उतरण्यासाठी ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धा परीक्षेची तयारी ठेवावी असे आवाहन खासदार सदाशिव लोखंडे यांनी यावेळी बोलताना केले.
कु.काजल यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन केल्याने त्यांना उज्वल भवितव्य प्राप्त होईल अशा शुभेच्छा खासदार सदाशिव लोखंडे यांनी यावेळी बोलताना दिल्या.तसेच स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल जिद्द व चिकाटी अंगिकरून स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ग्रामीण भागातील मुलांनी ठेवावी असे आवाहन यावेळी बोलताना खासदार
सदाशिव लोखंडे यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी कु.काजल यांचे वडील माजी सैनिक मेजर दीपक देशमुख,आई शोभाताई देशमुख,बहीण कु. कल्याणी देशमुख चुलते नितीन देशमुख,आजोबा शिवाजीराव देशमुख असे परिवारातील सदस्यांसह शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख राजेंद्र देवकर,शहरप्रमुख नितीन जगताप,नगरसेवक राजेंद्र मापारी,बंडू शिंदे,युवा सेनेचे जिल्हा प्रतिनिधी निरज नांगरे,दादासाहेब कोकणे, सुनील चिडे उपस्थित होते.सुधीर चव्हाण यांनी देशमुख कुटुंबातील सदस्यांचा परिचय करून देऊन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मेजर दीपक देशमुख यांनी आभार मानले.


Post a Comment