श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सवानिमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता

आडलेल्या नारायणाच्या सेवेत व धार्मिक कार्यात केलेल्या दानाने संपत्तीला सुगंधाची प्राप्ती-गुरुवर्य भास्करगिरी महाराज

नेवासा,प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सव सोहळयाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने काल्याची दहीहंडी फोडून  उत्साहात सांगता करण्यात आली. आडलेल्या नारायणाची सेवा व धार्मिक कार्यात केलेल्या दानाने संपत्तीला सुगंधाची प्राप्ती होते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
    यावेळी तीर्थक्षेत्र बहिरवाडी येथे गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे आगमन झाल्यानंतर प्रवरानदीच्या तीरावर बांधण्यात आलेल्या मंदिरात जाऊन त्यांनी श्री काल भैरवनाथांचे दर्शन घेतले.त्यानंतर पाण्याने घेरलेल्या
मंदिर परिसराची त्यांनी पहाणी केली.काला कीर्तन प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे संतपूजन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले.
        यावेळी येथील ज्ञानसागर सभामंडपात झालेल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की श्री कालभैरवनाथ हे भगवान शिव शंकराचा अवतार असून त्यांचा अवतार भक्तांच्या उद्धारासाठी झाला असून क्षेत्र बहिरवाडी हया जागृत  क्षेत्राचा महिमा ही अगाध असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.आपली पंचक्रोशी ही विविध तिर्थक्षेत्राने नटलेली असून संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी, नाथबाबा मंदिर,दक्षिणमुखी मारुती मंदिर,नारदमुनी मंदिर,खंडोबा म्हाळसा मंदिर या क्षेत्राच्या उद्धारासाठी सर्वांनी योगदान देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
    प्रेम व जिव्हाळा हे कुठे शाळेतून मिळत नाही तर तो आईवडिलांकडून मिळतो,मुलांमध्ये प्रेम व जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न आईवडिलांनी करावा,केलेल्या दानाने संपत्तीला खरा सुगंध येत असल्याने जीवनात आडलेल्या नारायणाची सेवा करा,गोधनाची व भूमी धनाची जोपासना करा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचे वर्णन व अवतार कार्य त्यांनी काल्याच्या कीर्तनात बोलताना व्यक्त केले.
   यावेळी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये योगदान देणाऱ्या भाविकांचा गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्रीफळ
प्रसाद देऊन गौरविण्यात आले यावेळी काल्याची दहीहंडी फोडून उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आला.यावेळी हभप रामनाथ महाराज पवार,विजय महाराज पवार,लक्ष्मण महाराज नांगरे,बाळू महाराज कानडे,हभप नामदेव महाराज कंधारकर,हभप भाऊसाहेब महाराज मोरे,हभप नळघे बाबा,मच्छिंद्र महाराज पठाडे,बदाम महाराज पठाडे यांच्यासह सोहळयात योगदान देणारे श्री कालभैरवनाथ मंदिर विश्वस्त मंडळ तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ व  भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज सोपान महाराज यांचे व त्यांच्या शिष्य वारकऱ्याचे वारीत बुलडोझर अंगावर आल्याने अपघातात निधन झाले या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना भक्त परिवाराच्या वतीने यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget