नेवासा, प्रतिनिधी
जेव्हा सर्व नागरिक मूलभूत अधिकारांसह मूलभूत कर्तव्याचे पालन करू लागतील तेव्हा खरा संविधान दिन साजरा होईल असे प्रतिपादन नेवासा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एम. बेलकर यांनी केले.
नेवासा न्यायालयात आयोजित संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दुसरे जिल्हा व अति. सत्र न्या. एस एम तापकीरे, वरिष्ठ स्तर दिवाणी न्या. बी यु चौधरी, दुसरे वरिष्ठ स्तर तथा मुख्य दंडाधिकारी जे आर मुलाणी, तिसरे वरिष्ठ स्तर दिवाणी न्या. श्रीमती एस डी सोनी, कनिष्ठ स्तर दिवाणी न्या. श्रीमती पी व्ही राऊत, तिसरे कनिष्ठ स्तर दिवाणी न्या. ए ए पाचारणे उपस्थित होते.
स्वागत अँड मयूर वाखुरे यांनी केले तर प्रास्ताविक न्या. बी यु चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेवासा न्यायालयातील ज्येष्ठ वकील कै.एम बी मुंगसे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
न्या. बेलकर पुढे बोलताना म्हणाले की, कायद्यापुढे सर्व समान आहेत, संविधानामुळे शिस्त आहे, आणि शिस्तीमुळे प्रगती आहे. त्यामुळे संविधानाचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. भारत हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. या देशात संविधानामुळे सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात यासाठी
मूलभूत कर्तव्याचे पालन आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड मयूर वाखुरे यांनी केले तर अँड ए.टी. झिने यांनी आभार मानले.

Post a Comment