मक्तापुर येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची काल्याच्या किर्तनाने सांगता

जीवनात रुसवे फुगणे रागद्वेष सोडून नव्या अंतकरणाने जगण्याचा प्रयत्न करा -ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील मक्तापुर येथे हनुमान मंदिर प्रांगणात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी हभप उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता करण्यात आली.भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार ईतर अवतारापेक्षा परिपूर्ण अवतार असल्याचे प्रतिपादन उद्धव महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले.जीवाला सुंदर बनवायचे असेल तर जीवनात रुसवे फुगणे, रागद्वेष सोडून नव्या अंतकरणाने जगण्याचा प्रयत्न करा असे आवाहन ही त्यांनी यावेळी बोलताना केले.
     यावेळी बोलताना हभप उद्धव महाराज म्हणाले की परमार्थाचा प्रसाद हा सर्वांची आवड एकरूप असल्या शिवाय प्राप्त होत नाही,परमार्थ हा एका अंगाने होत नाही तो सर्व गोष्टींनी मिळून करावा लागतो असा उपदेश त्यांनी यावेळी बोलताना केला.भगवान रामकृष्ण हे दोन्ही ही अवतार सामर्थ्यवान असे आहेत,त्यात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार हा परिपूर्ण अवतार आहे असे सांगून त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचे वर्णन झालेल्या काल्याच्या कीर्तनात केले.
    वारकरी संप्रदाय हा नित्य नूतनतेवर आधारित असून येथे क्रिप्ट चालत नाही म्हणून साचाबद्ध कीर्तन करू नये,
त्याने कधीही बुद्धीचा विकास होत नाही असा संदेश देत त्यांनी मनुष्य जीवाला सुंदर बनविण्यासाठी जीवनात रुसवे फुगवे,राग लोभाला तिलांजली द्या,रोज नव्या अंतःकरणाने जगण्याचा प्रयत्न करा असे आवाहन ही ह.भ.प.उद्धव महाराजांनी यावेळी बोलताना केले.सद्याच्या युगात ही अखंड हरिनाम सप्ताहात आपल्या भागातील 
टाळकरी,गायनाचार्य मृदुंगाचार्य हे युवक असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.जुन्या पिढी पासून संस्कार देणारी नवी पिढी तयार झाली पाहिजे त्यासाठी नव्या पिढीला जेष्ठांचे मार्गदर्शन गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
          यावेळी हभप नारायण महाराज ससे,पारायण व्यासपीठ चालक हभप भीमराज महाराज निकम,गणेश महाराज गायकवाड,प्रताप महाराज कोलते,बन्सी महाराज गायकवाड,कृष्णा महाराज मोरे,योगेश महाराज शेजुळ, कृष्णा महाराज सुसे,यांच्यासह सोहळा कमिटीचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अन्नदायासह ईतर सेवेसाठी योगदान देणाऱ्यांचा यावेळी उद्धव महाराजांच्या हस्ते गौरव करण्यात आला.काल्याची दहीहंडी फोडल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

        दि.३० ऑक्टोबर पासून मक्तापुर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सोहळयामध्ये देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख,श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज यांनी भेट दिली व सोहळा यशस्वीतेबद्दल शुभेच्छा दिल्या.  या सोहळ्यात सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण झाले तर सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ यावेळेत नामवंतांनी कीर्तने झाली या किर्तनांना देखील मोठी गर्दी झाली होती.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget