राजेंद्र वाघमारे | नेवासा, (प्रतिनिधी)
बिड जिल्ह्यातील केज तालूक्यातील दहीफळ वडमाऊली गांवच्या युवकाने बिड जिल्हाधिकाऱ्यांना राज्याच्या मुख्यमंञी पदाचा तिढा सुटे पर्यंत मुख्यमंञी पदाचा पदभार मिळण्यासाठी राज्यपालांना निवेदन अतितत्काळ निवेदन पोहचविण्यासाठी दिलेले आसून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना व सामान्यांना मी शेतकरी पुञ आसल्याने न्याय देईल असेही हा युवक या निवेदनात म्हणत आसून त्याचे हे निवेदन सध्या व्हॉटस् अॅपवर व्हायलर होत आसून चर्चेचा विषय बनला आहे.
बिडच्या दहीफळ वडमाऊली गांवच्या श्रीकांत विष्णू गदळे या युवकाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मी १० - १२ वर्षांपासून राजकारण व समाजकारणामध्ये आग्रेसर आहे.शेतकरी व गोरगरीबांच्या प्रश्नावर सातत्यानेच काम करत आसून सध्या महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक अपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे आहे.त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता चिंतेत आहे.
एकीकडे महाराष्ट्रात भाजप - शिवसेना मुख्यमंञी पदाचा तिढा निर्माण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे माझ्या मुख्यमंञी पदाचे निवेदन राज्यातील जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात यावा अशी विनंतीही या युवकाने निवेदनात करुन निवेदनाची दखल न घेतल्यास लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आसल्याने या युवकाचे बिडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन मोठे व्हायलर होवून चर्चेचा विषय बनला आहे.

Post a Comment