पाथर्डी तालुका काँग्रेस कमीटी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आक्रमक
पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
अतिवृष्टी,बॅंकाची दिवाळखोरी,आर्थिक मंदी,बेरोजगारी,महगाई,शेतकरी आत्महत्या,गुन्हेगारी,ठप्प झालेले उद्योग,आरोग्य,शिक्षण आदी समस्यावर तातडीच्या उपाययोजना कराव्यात.
यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ पाथर्डी तालुका नायब तहसिलदार शैलजा सरोदे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख,उपाध्यक्ष रवी पालवे, सेवादल चे किशोर डांगे, उपाध्यक्ष वसंत खेडकर, तालुका संघटक सचिन राजळे, अल्पसंख्यांक चे तालुका अध्यक्ष अकबर पटेल, मुन्ना खलिफा, जुनेद पठाण, लहानू गर्जे, दिलीप पानखडे, सुरेश डोमकावळे, सय्यद अस्लम, जब्बार आतार, माजी नगर सेवक नसीर आतार, गोवर्धन लवांडे, नितीन खंडागळे, राजू मनेळ, दीपक चंदनशिव, जावेद पिंजारी, शैजादे शेख, मुन्ना भाई शेख,योहान खंडागळे, ज्ञानेश्वर भाबड, कल्याण बर्डे,तसेच इतर पदाधिकारी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment