देवगड येथे श्रीराम जन्मभूमी निकालाचा मिष्टान्न प्रसाद देऊन आनंदोत्सव साजरा
नेवासा(प्रतिनिधी)
सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमी बाबतचा निकाल दिला त्या निकालाला अनुसरून सर्व धर्मीय बांधवांनी स्वागत केले.याचाच एक भाग म्हणून श्रीराम जन्मभूमीच्या निकालाच्या प्रित्यर्थ विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे भक्त परिवाराकडून संतपूजन करण्यात आले.संस्थानच्या वतीने मिष्टान्नरुपी प्रसाद देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गुरुवारी अन्नपूर्णा सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सौ.गौरीताई प्रशांत गडाख,विश्व हिंदू परिषेदेचे देवगिरी प्रांत प्रमुख आप्पासाहेब बारगजे,राष्ट्रीय विश्वस्त शिवाजीराव शेरकर,अँड.सुनील चावरे,प्रांत प्रचारक अभिजित हटकरे,पुणे जिल्हा भक्त मंडळाचे प्रमुख उद्योजक रविंद्र मुनोत,रतीलाल गुगळे,गिरीश घाटोळ,नगर भक्त परिवाराचे संतसेवक सुनील नाळके,विजय गुंदेचा, संजय नेहुल,भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,नेवासा येथील जैन समाज मंडळाच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे संतपूजन करण्यात आले.व पेढा भरवून श्रीराम जन्मभूमी निकालाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी दूरवरून आलेल्या सर्व भाविक व भक्त मंडळाचे गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की श्रीराम जन्मभूमी निकालाने कोणाचा जय नाही कोणाचा पराजय नाही,देशाचा स्वाभिमान वाढविणारा निकाल कोर्टाच्या माध्यमातून प्रगट झाला आहे त्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालय व सर्व न्यायाधीश महोदयांचे स्वागत करून अभिनंदन केले.श्रीराम जन्मभूमी करीता प्राणांची आहुती देणाऱ्यांची आठवण काढून त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सदरचा निकाल हा देशाचा स्वाभिमान होता सर्व जातीधर्माच्या लोकांनी या निकालाचे स्वागत करून देशाची राष्ट्रीय एकता व अखंडता किती मजबूत आहे याचा दाखला दिला.ऋषिमुनींचे विचार टिकविण्यासाठी सर्वांनी आध्यात्मिक कार्यासाठी व देवदेवतेंचा सन्मान सर्वांना बरोबर घेऊन चालण्यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर हभप बाळू महाराज कानडे यांनी सर्व भक्तांचे आभार मानले.यावेळी संतसेवक ह.भ.प. लक्ष्मीनारायण जोंधळे,ज्ञानदेव लोखंडे,अंबादास फोलाने,,सरपंच अजय साबळे, मारुती साबळे,बदामभाऊ पठाडे,महेंद्र फलटणे,चांगदेव साबळे,पंढरीनाथ जाधव,रुस्तुम सुकाशे,रमेश मोरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment