बोधेगाव- वार्ताहर
शेवगाव तालुक्यातील घोटण येथील श्री क्षेत्र मल्लिकार्जुनेश्वर स्वयंभू देवस्थान येथे त्रिपुरारी पोर्णिमानिमित्त मंदिरासह परिसरात हजारो दिव्य लावून दीप उत्सव साजरा करण्यात यात आला दिव्यामुळे परिसर उजळुन निघाला होता भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती
श्री क्षेत्र घोटण येथील अत्यंत पुरातन कालीन स्वयंभू व हेमांडपंथी बांधकाम असलेल्या श्री मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात अनेक वर्षांपासून त्रिपुरारी पोर्णिमेचे औचित्य साधून मंदिर व परिसरात भाविक एकत्र येऊन सुमारे हजारोंच्या संख्येने दिव्य लावून हा दीप उत्सव हजारो वर्षांची परंपरा सालाबादप्रमाणे साजरा केला जातो मंदिराचे मुख्य पुजारी दिलीप गुरव यांच्या नियोजनातून व ग्रामस्थ महिला मंडळ भाविक व लहान मोठी मुले-मुली यांच्या अथक परिश्रमातून हे दीप लावले जातात यंदा सुमारे मंदिर व परिसरात चोहीकडे पाच हजार दिव्य लावण्यात आले होते मंदिरासमोर महिलांनी भव्यदिव्य आकर्षक रांगोळी रेखाटली होतो तसेच दिव्याचे सुबक डिझाइन काढण्यात आले होते त्यामुळे परिसर हजारोंच्या दिव्यांच्या प्रज्वलनातून उजळला गेला होता तर हा उत्सव भाविकांनी अत्यंत भक्तमय वातावरणार संपन्न झाला आरतीनंतर या कार्यक्रमाचा सांगता झाला यावेळी रणजित घुगे, गणेश निकम, सुरेश मBस्के, सचिन मस्के, भागचंद तिवारी, नारायण वणवे, भाऊ वणवे, पोलीस निरीक्षक मस्के, रवींद्र शिंदे, जगन्नाथ आव्हाड, अविनाश मोटकर, विठ्ठल थोरवे, यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
महादेवाने त्रिपुर नामक राक्षकांचा वध केला होता आणि पूर्ण जगताची त्या त्रासातून मुक्ततता झाली होती म्हणून महादेवाचे ऋण फेडण्यासाठी या त्रिपुरारी पौर्णिमेच्या तिथीस पणत्या व त्रिपुर वात लावून दिव्य प्रकाशमय केला जातो.
- दिलिप गुरव शिंदे


Post a Comment