नेवासा नगरपंचायतकडून घरकुल लाभधारकांची अडवणूक ! तांञिक कारणे सांगून लाभधारकांना टोलवा टोलवी !

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा नगर पंचायत कार्यालय घरकुल विभाग शाखेकडून घरकुल मंजूर होवूनही लाभ धारकांना पैसा अदा करण्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होवून उडवा - उडवीचे कारणे सांगितले जातात.त्यामुळे घरकुल लाभधारकांनी कर्जबाजारी होवून घरकामासाठी पाया व गट स्वखर्चाने बांघूनही नगरपंचायत कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आल्याने 'दाद' कोणाकडे मागायची असा यक्ष सवाल लाभधारकांतून व्यक्त होत आहे.
  नेवासा नगरपंचायतीच्या घरकूल विभागाचा कारभार म्हणजे "अंधाळ दळतय अन् कुञ पिठ खातय" या सदरात मोडणार आहे.नगरपंचायत विभागातून घरकूल मंजूर झाल्यानंतर लाभधारकांनी स्वखर्चाने पाया व गट बांधणी केल्यानंतर कामाचे छायाचिञ काढण्याचे काम औरंगाबाद येथील ठेकेदाराला देण्यात आलेले आसल्यामुळे छायाचिञ काढण्यासाठीच महीण्याचा कालावधी लोटला जातो तर त्या घरकूल लाभधारकाच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी तीन ते चार महीने होवूनही पैसे जमा होत नसल्याने लाभधारकांतून तिव्र संताप व्यक्त होत आसून "भिक नको पण कुञ आवर" असेच म्हणण्याची वेळ नेवाशातील लाभधारकांवर आली आसून अधिकारी अन् पदाधिकाऱ्यांच्या मिलीभगतीमुळे सामान्यांना नगरपंचायतीच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे.
  नेवासा येथे घरकूल लाभधारकांना धनादेश वाटपासाठी गृहनिर्माण मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांना नेवाशात बोलावून मागे कार्यक्रम पार पडला.त्यावेळी विखे पाटलांनी गटकामाचा धनावेश चाळीस हजार रुपये कसा देता ? त्या पैशात काहीही होत नाही तोच धनादेश एक लाखाचा देण्याचे आदेश नगरपंचायत प्रशासनाला दिलेले होते.माञ नगरपंचायत बांधकाम विभागाने गृहनिर्माण मंञ्याच्या आदेशाला केराची टोपली तर दाखलीच माञ कामे पुर्ण झालेल्या लाभधारकांनाही कामे होवूनही तीन - चार महीण्याचा कालावधी उलटला तरी नगरपंचायतीकडून उडवा - उडवीचे उत्तरे देवून लाभधारकांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत.त्यामुळे लाभधारकांनी व्याजाने पैसे काढून काम पुर्ण करुन नगरपंचायतीच्या दारात दररोज भिक मागितल्या सारखे जावून अधिकाऱ्यांना विनवणी करावी लागत आसल्याचे चिञ सध्या नेवाशात दिसून येत आहे.

चौकट
भाऊसाहेब निवृत्ती गर्जे यांनी गटबांधकाम पुर्ण करुन चार महीण्याचा कालावधी पुर्ण झाला.एक - एक कागद सांगितला जातो कागद पञे देवून खात्यात पैसे जमा झाले नाही असे गर्जे यांनी सांगितले

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget