चांदेकसारेत साई पालखीचे स्वागत
चांदेकसारे ( वार्ताहर)
अखंड हिंदुस्थानचे आराध्य असलेले शिर्डीचे साईबाबा भक्तांच्या हाकेला ओव देणारे असून बाबांनी सांगितलेल्या पंचसूत्राच्या जोरावर प्रत्येकाने आपले जीवन चालवले तर कोणाच्याही जीवनात नैराश्य येणार नाही. सबका मालिक एक असून प्रत्येकाने श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर जीवन सुखी होईल ही शिकवण बाबांनी दिली. मुंबईसह अनेक राज्यातून साईच्या दर्शनासाठी पालखी आणली जाते.पायी चालत आलेल्या प्रत्येक साई भक्ताने साईंचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या शरीरातील ऊर्जा वाढते असे प्रतिपादन आधार प्रतिष्ठानचे मार्गदर्शक केशवराव होन यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे साई पालखीचे पूजन करताना बोलत होते.
हॉटेल साई मुकुंदा वर या पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी चालक संजय पाटील, धीरज बोरावके ,राजू शेख, विजय होन, राजेंद्र होन, श्री गुरसळ आदी उपस्थित होते.
श्री गणेश मित्र मंडळ पिंळजे भिवंडी येथून ही पालखी सालाबाद प्रमाणे चांदेकसारे येथे मुक्कामी येत असते.
केशवराव होन यांच्या हस्ते पालखीचे पूजन व पालखी चालक संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
पालखी चालक संजय पाटील यांनी सांगितले की शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाची ओढ लागलेल्या पालखीतील सदस्यांना पायी चालत असतानासुद्धा जराही थकवा जाणवत नाही.ही ऊर्जा व उभारी साईबाबांच्या दर्शनासाठी चालल्यानेच मिळते. साईबाबा सर्वशक्तिमान असून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पालखी चालवत आहोत मात्र कुठलीही अडचण आम्हाला आली नाही. शेवटी आभार धीरज बोरावके यांनी मानले.


Post a Comment