नेवासा, प्रतिनिधी
राज्याचे गृहनिर्माण मंञी राधाकृष्ण विखे - पाटील व खासदार डॉ सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपाला सुगीचे दिवस येतील असा राजकिय प्रयास बांधला जात आसतांना विधानसभा निवडणूकीत जनतेने कॉंग्रेस आघाडीला कौल दिला माञ या कौलाचे खापर पराभूत उमेदवार विखे पिता - पुञांवर फोडत आसून निवडणूकीत भाजपाचे आमदार पराभूत झाल्यामुळे विखेंच्या कार्यक्रमांना दांडी मारत आसल्याने आता विखे पाटील यांच्यावरचा रोष जिल्ह्यात उघड झाला आहे.
पारनेरमध्ये शिवसेनेचे पराभूत उमेदवार विधानसभेचे उपसभापती नामदार विजय औटी विधानसभा निवडणूकीत पराभूत झाल्याने खासदार विखेंच्या दौऱ्याकडे त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरविली तर नगर तालूक्यात पराभूत आमदार शिवाजी कर्डीले यांनीही नाराजीचा सुर दाखवत त्यांच्या कार्यकर्त्यांनी दांडी मारली.नेवाशात पराभूत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या समर्थकांतून विधानसभा निवडणूकीतच मुरकुटेंच्या विकास दिंडीला खासदार विखेंनी दांडी मारल्यामुळे नाराजी पसरली होती.जनतेचा कौल विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यात कॉंग्रेस आघाडीला मिळाला त्याचे खापर विखे पिता - पुञांवर सोयिस्कर फोडून विखेंच्या कार्यक्रमाला पराभूत आमदार दांडी मारुन विखेंच्या दिव्याला खोडा घालतांना दिसून येत आसून सत्तेच्या सारिपाटाचे भिजत घोंगडे संपल्यानंतर नगर जिल्ह्यात विखेंना मिळणाऱ्या दिव्यावर पराभूत आमदार अकडांतांडव करणार आसल्याचे चिञ खासदार विखेंच्या दौऱ्यात पराभूत उमेदवार व त्यांचे बगलबच्चे पाठ फिरवत आसल्याने दिसून येत आहे.

Post a Comment