विसापूर जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर.पंचान्नव टक्के भरले

पर्यटकांच्या दृष्टीने ठरणार पर्वणी. 

नानासाहेब जठार, 
विसापूर- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील शंभरीच्या उंबरठ्यावर असणारा विसापूर जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.जलाशयात पंचान्नव टक्के पाणी साठा झाल्याने येत्या दोन तीन दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असल्याने पर्यटकांचे दृष्टीने पर्वणी ठरणार आहे. 
  शनिवार दि.२ नोव्हेंबर रोजी सकाळी विसापूर जलाशयात ९५ टक्के पाणी साठा झाला आहे.१९२७ साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले त्यावेळी त्याची पाणी साठवण क्षमता ११३९ दशलक्ष घनफूट होते.ती आता ९२७ दशलक्ष घनफूट झाली आहे.त्या पैकी धरणामध्ये ८८० दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला आहे.विसापूर धरण भरण्यासाठी कुकडी कालव्याचे पाणी सोडण्यात आले आहे.तसेच विसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने हंगानदीला पुर आल्यामुळे पाण्याचे पातळीत झपाट्याने वाढ झाली.त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.विसापूर धरण शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने बांधले आहे.संपूर्ण धरण बाराशे मिटर मातीचा बांध टाकून तयार केलेले आहे. धरणाचा सांडवा चारशे मीटरचा असल्याने ओव्हरफ्लोचे पाण्यात आकर्षक धबधबा तयार होत असल्याने पर्यटक आपोआप आकर्षीत होतात.२०१८ मध्ये विसापूर ओव्हरफ्लो झाले होते त्यावेळी जिल्हाभरातुन पर्यटकांनी हजेरी लावली होती.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget